सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले, आज (रविवारी ) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांना निरोप देण्यासाठी सिनेविश्वातील बरेच कलाकार उपस्तिथ होते. गेले काही महिने ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. शाह यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आला होत, पण मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.


याबाबदल त्यांच्या मॅनेजर ने काही खुलासे केले आहेत. एक मुलाखतीत सतीश शाह यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी सांगितले की ' काळ दुपारी जेवताना हा सर्व प्रकार घडला 'दुपारी २ च्या सुमारास ते जेवायला बसले आणि अचानक बेशुद्ध पडले. अर्ध्या तासांनंतर रुग्णवाहिका आली त्यांना आम्ही लगेचच रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सतिश शाह यांच्या मॅनेजर ने सांगितलं कि 'ते गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजारांनी त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच कोलकत्ता यामध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांना दिड महिने आराम करायला सांगितलं होता.


नंतर ते पूर्णपणे बरे होऊन घरी सुद्धा परतले. याशिवाय सतीश सहा यांचे मित्र राकेश बेदी यांनी सांगितले की त्यांना हृदयाशी निगडित ही काही समस्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांट झाल्यामुळे कदाचित त्यांच्या शरीराला ते मानवल नाही. सतीश यांना निरोप देण्यासाठी पंकज कपूर, रत्ना पाठक, सुप्रिया पाठक, नासिरुद्दीन शाह, रुपाली गांगुली, राजेश कुमार,अनंग देसाई आणि फराह खान यांसारखे सेलिब्रिटी पोहोचले होते. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते. सतीश शहा याना निरोप देताना अभिनेत्री रुपाली गांगुली खूप रडली. राजेश कुमारलाही अश्रू अनावर झाले होते.

Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट