ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या दौऱ्यादरम्यान इंदूरमध्ये सुरक्षा चूक समोर आली आहे. हॉटेल रॅडिसन ब्लू येथून एका कॅफेकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंशी एका तरुणाने छेडछाडीचा प्रयत्न केला.

या तरुणाने त्यांची गाडी अडवून त्यांना चुकीचा स्पर्श करत अश्लील वर्तन केले. पोलिसांनी त्यास तात्काळ अटक केली.