गूगल पे, पेटीएम आणि फोन पे ला टक्कर देणार स्वदेशी झोहो पे

मुंबई : बिझनेस सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केल्यानंतर आता झोहो कंपनी डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात उतरली आहे. गूगल पे (G Pay), पेटीएम (PayTM) आणि फोनपे (Phone Pay) सारख्या मोठ्या अ‍ॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी झोहो लवकरच झोहो पे हे नवे अ‍ॅप लाँच करणार आहे. विशेष म्हणजे हे केवळ स्वतंत्र अ‍ॅप नसेल, तर झोहोच्या मेसेजिंग अ‍ॅप अरत्ताईमध्येही समाविष्ट असेल. म्हणजे चॅट करताना अ‍ॅप बदलण्याची गरज न पडता पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य होईल.


झोहो पेमेंट्स टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवरामकृष्णन ईश्वरन यांनी सांगितले की, सोपे, सुरक्षित आणि निर्वेध व्यवहार करणे हे झोहो पे चे प्रमुख उद्दिष्ट आहे. अरत्ताईमध्ये पेमेंट फीचर समाविष्ट केल्याने युझर्सना अधिक सुलभ अनुभव मिळेल. झोहो आधीपासूनच व्यावसायिक देयके आणि पॉईंट-ऑफ-सेल सोल्युशन्स पुरवते. आता कंपनी फिन्टेक क्षेत्रात आणखी विस्तार करत असून, पेमेंट्ससोबतच लेंडिंग, इन्शुरन्स, ब्रोकिंग आणि वेल्थटेक सेवाही देण्याची योजना आहे.


याशिवाय, झोहो झोहो बिलिंग नावाचे नवे इनव्हॉइसिंग आणि सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट टूल आणि झोहो पेरोल सिस्टीम बँकांशी जोडण्याचे काम करत आहे. त्यामुळे लहान व्यवसायांना पेमेंट, कॅश फ्लो आणि पेरोल व्यवस्थापन एकाच प्लॅटफॉर्मवर करता येईल.


२०२१ मध्ये लाँच झालेल्या अरत्ताई अ‍ॅपचा मुख्य भर डेटा गोपनीयतेवर आहे. त्यातच झोहो पेचे एकत्रीकरण हे नैसर्गिक पाऊल ठरणार आहे. सध्या झोहो पे अंतर्गत चाचणी टप्प्यात असून, येत्या काही महिन्यांत ते टप्प्याटप्प्याने लाँच केले जाईल.


भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात आधीपासूनच गुगल पे, फोनपे आणि पेटीएमचे वर्चस्व असले तरी झोहोच्या एन्ट्रीमुळे या क्षेत्रात नवे वळण येईल. विशेषतः अरत्ताईमधील चॅट-पेमेंट फीचर लहान व्यावसायिकांसाठी मोठी सोय ठरेल आणि गोपनीयतेवर लक्ष देणाऱ्या वापरकर्त्यांचा विश्वास झोहोकडे वाढवेल.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुल कर्णधार

मुंबई : आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सलामीवीर

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण, FIR नोंदीत नेमकं काय?

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी गर्जे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर

कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ?

बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या दोघांच्या नेतृत्वात कर्नाटक

अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या

वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या