महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पकडले आहे. संबंधित महिलेने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये ९९७.५ ग्रॅमची सोन्याची बिस्कीटे लपवली असून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचा तस्करीचा डाव उधळून लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २४ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. ही महिला प्रवासी यांगून (म्यानमार) येथून दिल्लीला आली.



प्रवासादरम्यान महिला आपल्या मौल्यवान वस्तू बॅगमध्ये ठेवतात. मात्र दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलेल्या महिलेने आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवून ठेवले होते. ही महिला विमानतळावरील ग्रीन चॅनलमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती. ग्रीन चॅनेल अशा प्रवाशांसाठी असते ज्यांच्याकडे कोणतेही प्रतिबंधित किंवा करपात्र वस्तू नसतात. यावेळी अधिकाऱ्यांची नजर महिलेवर पडली आणि त्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. त्यामुळे संपूर्ण विमानतळावर खळबळ माजली.




चौकशी सुरु असताना, महिलेने तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये सहा सोन्याची बिस्कीटं लपवली असल्याची एक धक्कादायक गोष्ट अधिकाऱ्यांसमोर आली. कस्टम विभागाने तात्काळ ही सोन्याची बिस्कीटं जप्त करून महिलेवर गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेलं सोनं १९६२ च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले आहे. या कायद्यानुसार, सोनं किंवा मौल्यवान वस्तू जाहीर न करता देशात आणणे किंवा बाहेर नेणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. आता या प्रकरणात पुढील तपास केला जात असून ही महिला कोणत्याही तस्करी टोळीशी संबंधित आहे की नाही? याची चौकशी अधिकारी करत आहेत.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव