वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार, तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू

पालघर : भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये स्थानिक तरुणांना नोकरीची संधी मिळावी यासाठी व्हीपीपीएल वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. तरुणांना समुद्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्य आणि ज्ञान अवगत व्हावे यासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एमटीआय) सोबत ‘जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स’ संयुक्तपणे आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार(एमओयू) नुकतेच करण्यात आला. जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, उन्मेष शरद वाघ, (भा.रा.से.), आणि एससीआयचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बिनेश कुमार त्यागी यांनी या करारावर स्वाक्षरी केली.


करारात नमूद करण्यात आले की, व्हीपीपीएल द्वारे प्रायोजित उमेदवारांसाठी एससीआय -एमटीआय हा कोर्स आयोजित करेल, ज्यामध्ये समुद्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करून त्यांना समुद्री क्षेत्रातील करिअरसाठी तयार केले जाईल. एससीआय मॅरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना शॉर आणि फ्लीट कर्मचारी यांच्या प्रशिक्षण व पुनःप्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. कंपनी आणि भारत सरकारच्या दृष्टिकोनानुसार ही सेवा बाह्य सहभागींनाही प्रदान केली जाते, जेणेकरून भारत एक प्रगत समुद्री देश बनू शकेल. दरम्यान, एससीआय-एमटीआयला जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स आयोजित करण्यासाठी शिपिंग महासंचालनालयाची मान्यता आहे.





प्रशिक्षण कोर्सचा कालावधी सहा महिने आहे. प्रशिक्षण कोर्स निवासी स्वरूपाचा असेल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि सीफेरर्स ट्रस्ट (बेस्ट) साठी परीक्षा मंडळाने घेतलेल्या एक्झिट परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, बेस्टकडून प्रमाणपत्र जारी केले जाईल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, व्हीपीपीएलने कौशल्य विकास कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि आगामी अभ्यासक्रम आणि संधींबद्दल माहिती प्रदान करण्यासाठी एक समर्पित चॅटबॉट सुरू केला आहे. आतापर्यंत, या कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे, वाढवण परिसरातील गावांमधील तरुणांकडून आतापर्यंत ३८ हजाराहून अधिक नोंदणी झाल्या आहेत.



वाढवण बंदराच्या परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक तरुणांना कौशल्य-आधारित उपजीविकेचे प्रशिक्षण देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. या करारामुळे स्थानिक तरुणांना शिपिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एससीआय मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसोबतच्या या सहकार्याद्वारे, आम्ही स्थानिक तरुणांना भारताच्या सागरी परिसंस्थेच्या वाढीस हातभार लावण्यासाठी आणि त्यांची फायदेशीर सागरी कारकीर्द घडवण्याचा दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत. - उन्मेष वाघ. ( भा.रा.से.) अध्यक्ष जेएनपीए तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्हीपीपीएल.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास, पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे