REIL: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडची भारतातील एआय इकोसिस्टिम उभारण्यासाठी मोठी घोषणा

मोहित सोमण: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण उपकंपनी रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड (REIL) आज २ कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने १० रूपये प्रति शेअर दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या २०००००० इक्विटी शेअरची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने सुरुवातीचे दोन कोटीचे सबस्क्रिप्श भरले आहे. रिलायन्स इंटेलिजन्स ही कंपनी फेसबुक (मेटाची उपकंपनी) कंपनीशी संलग्न जेवी (Joint Venture JV) भागीदारीत स्थापन करण्यात आल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते. या नव्या करारात रिलायन्स इंटेलिजन्स ७०% व फेसबूक ३०% गुंतवणूक कंपनीत होल्ड ठेवणार आहे. ८५५ कोटीची गुंतवणूक दोन्ही कंपन्या नी मिळून केल्याचे रिलायन्स समुहाने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने या घोषणेची अधिसूचना सिंगापूर व लक्समबर्ग एक्सचेंजला दिली आहे.


कंपनीने आपल्या निवेदनात नेमक्या शब्दात म्हटले आहे की,'२९ ऑगस्ट २०२५ आणि १० सप्टेंबर २०२५ रोजीचा खुलासा.... कृपया लक्षात घ्या की रिलायन्स इंटेलिजेंस लिमिटेड (“रिलायंस इंटेलिजेंस”), कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलायंस एंटरप्राइज इंटेलिजेंस लिमिटेड (“REIL”) ची स्थापना केली आहे. रिलायंस इंटेलिजेंस प्रत्येकी १० रुपयांच्या २०००००० इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सबस्क्रिप्शनसाठी २ कोटी रुपये गुंतवेल. रिलायंस इंटेलिजेंसची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून भारतात समाविष्ट केलेली REIL, मेटा प्लॅटफॉर्म्स, इंक. (“मेटा”) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या फेसबुक ओव्हरसीज, इंक. (“फेसबुक”) सोबत सुधारित आणि पुनर्संचयित संयुक्त उपक्रम करार (“JV करार”) नुसार ‘संयुक्त उपक्रम कंपनी’ बनेल. REIL इतर गोष्टींबरोबरच, एंटरप्राइझ AI सेवा विकसित करणे, विपणन करणे आणि वितरण करणे यामध्ये गुंतले जाईल.


ज्युएंट व्हेंचर करारानुसार, रिलायंस इंटेलिजेंस ७०% आणि फेसबुक REIL मध्ये उर्वरित ३०% हिस्सा धारण करेल. रिलायन्स इंटेलिजेंस आणि फेसबुकने संयुक्तपणे ८५५ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक केली आहे. हा व्यवहार संबंधित पक्ष व्यवहारात येत नाही आणि कंपनीच्या कोणत्याही प्रवर्तक/ प्रवर्तक गट/समूह कंपन्यांना वरील व्यवहारात कोणताही रस नाही. आरईआयएलच्या स्थापनेसाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक मंजुरीची आवश्यकता नव्हती. कंपनीला २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलायन्स इंटेलिजेंसकडून सूचना मिळाली आहे.' असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या महिन्यात रिलायन्स इंटेलिजेंस कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून रजिस्ट्रारकडे समाविष्ट (Incorporated) करण्यात आली होती. त्यावेळीच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून निगमन प्रमाणपत्र प्राप्त झाले असे आरआयएलने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले होते. 'रिलायन्स इंटेलिजेंस लिमिटेड ही ९ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे' असे रिलायन्सने आपल्या फाइलिंगमध्ये स्पष्ट केले होते.


वार्षिक सर्वसाधारण सभेत एआय पुशची घोषणा खुद्द मुकेश अंबानी यांनी केली होती. अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नवीन उपकंपनीच्या स्थापनेबद्दल बोलले होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एआय पायाभूत सुविधा असतील असे स्पष्ट केले होते. भारतात एआय (Artificial Intelligence) इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच कंपनीने जागतिक टेक टायटन्स कंपनी मेटा आणि गुगलसोबत नवीन भागीदारी स्पष्ट केली होती.


रिलायन्स इंटेलिजेंसची संकल्पना चार उद्दिष्टांसह आहे: भारताच्या पुढील पिढीतील एआय पायाभूत सुविधांना गृहीत धरणे, जागतिक भागीदारींना गृहीत धरणे, भारतासाठी एआय सेवा निर्माण करणे आणि एआय प्रतिभेला प्रोत्साहन देणे. जामनगरमध्ये गिगावॅट स्केल, एआय-रेडी डेटा सेंटरवर काम आधीच सुरू झाले आहे. रिलायन्सच्या नवीन ऊर्जा परिसंस्थेद्वारे समर्थित आणि एआय प्रशिक्षण आणि अनुमानासाठी कस्टम-मेड या सुविधा भारताच्या वाढत्या गरजांनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केल्या जातील' असे अंबानी सर्वसाधारण बैठकीत म्हणाले होते.

Comments
Add Comment

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६