'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी


सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला. एकदिवसीय सामन्यांत लागोपाठ विजय मिळवत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा विजयरथ भारताच्या रोहित शर्मा (रो) आणि विराट कोहली (को) या जोडगोळीने शानदार भागीदारी करुन रोखला.


नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने ऑलआऊट केले. कांगारुंनी ४६.४ षटकांत सर्वबाद २३६ धावा केल्या आणि भारतापुढे ५० षटकांत २३७ धावा करण्याचे आव्हान ठेवले. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ३८.३ षटकांत एक बाद २३७ धावा केल्या आणि सामना नऊ गडी राखून जिंकला. याआधी पर्थमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून विजय मिळवला तर अ‍ॅडलेडमध्ये दोन गडी राखून विजय मिळवला होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाचा संघ सिडनीत आला होता. पण त्यांना सिडनीत जिंकून भारताला व्हाईटवॉश देणे जमले नाही. शुभमन गिल २४ धावा करुन हेझलवूडच्या चेंडूवर अ‍ॅलेक्स कॅरीकडे झेल देऊन परतला. नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने सामन्याची सूत्रं हाती घेतली आणि भारताला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने १२५ चेंडूत तीन षटकार आणि तेरा चौकार मारत नाबाद १२१ धावा केल्या तर विराट कोहलीने ८१ चेंडूत सात चौकार मारत नाबाद ७४ धावा केल्या. याआधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ४१, हेडने २९, मॅथ्यू शॉर्टने ३०, रेनशॉने ५६, अ‍ॅलेक्स कॅरीने २४, कूपर कॉनोलीने २३, मिचेल ओवेनने १, मिचेल स्टार्कने २, नॅथन अ‍ॅलिसने १६, झम्पाने नाबाद २ आणि ह


सामनावीर आणि मालिकावीर रोहित शर्मा


ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा हाच सिडनी सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर झाला. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २०२ धावा केल्या. यात एक शतक आणि एक अर्धशतक यांचा समावेश आहे. रोहितने मालिकेत पाच षटकार आणि २१ चौकार मारले.



ऐतिहासिक कामगिरी




  1. रोहित - विराट जोडीने बाराव्यांदा १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. त्यांनी सिडनीच्या सामन्यात नाबाद १६८ धावांची भागीदारी केली.

  2. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर. अव्वलस्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत तर विराट कोहलीने १४ हजार २५५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या कुमार संघकाराने १४ हजार २३४ आणि चौथ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटिंगने १३ हजार ७०४ धावा केल्या आहेत.

  3. रोहित शर्माने सिडनी सामन्यात १२५ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. त्याने या शतकी खेळीला तीन षटकार आणि तेरा चौकार मारत सजवले. रोहितच सिडनीत सामनावीर झाला. त्याला मालिकावीर या पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

  4. रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज झाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ डावात ९ शतके केली आहेत. या यादीत तो अव्वलस्थानी आहे. यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सचिन तेंडुलकरने ७० डावात ९ शतके केली आहेत. विराट कोहली यादीत तिसऱ्या स्थानी आहे, त्याने ५१ डावात ८ शतके केली आहेत.




Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण

IND vs SA 1st Test : बुमराहचा 'डबल धमाका'! दक्षिण आफ्रिकेचे टॉप ३ फलंदाज तंबूत; जसप्रीत बुमराहच्या हाती २ महत्त्वाच्या विकेट्स!

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला सामना

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला कसोटी सामना, भारत गोलंदाजी करणार

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये

'इडन गार्डन्स' वर आजपासून द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी !

पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित ; शुभमनने दिले संकेत मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात