मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्हरीच्या तारखेपासून ५ वर्षांवरून जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवला आहे. जवळपास ७ वर्षांची नवीन विस्तारित वॉरंटी मुदत किया सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्सच्या नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी आहे, ज्यांच्याकडे सध्या ५ वर्षांची वॉरंटी आहे. आधीच ५-वर्षांच्या विस्तारित वॉरंटीचा अवलंब केलेले विद्यमान किया ग्राहक ३२१७० रूपयांपासून (कर वगळून) सुरू होणाऱ्या ५+२-वर्ष कव्हरेजमध्ये अपग्रेड होऊ शकतात. नवीन ग्राहकांसाठी ७ वर्ष विस्तारित वॉरंटी ४७२४९ रूपयांपासून (कर वगळून) उपलब्ध आहे. देशभरातील कोणत्याही अधिकृत किया डिलरशिपमध्ये ७-वर्ष विस्तारित वॉरंटीचा आनंद घेता येऊ शकतो.
किया इंडियाच्या विक्री व विपणनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले,'किया इंडिया ग्राहकांसाठी फायदे वाढवण्याप्रती आणि परिपूर्ण मन:शांतीची खात्री घेण्याप्रती कटिबद्ध आहे. आमचे वॉरंटी कव्हरेज नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवत आम्ही आमच्या वेईकल्सचा टिकाऊपणा व दर्जावरील आत्मविश्वासाची खात्री देतो, तसेच आमच्या अधिकृत सर्विस नेटवर्कच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत आहोत. हा उपक्रम प्रत्येक किया ग्राहकाला अपवादात्मक मालकीहक्क अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य देण्याप्रती आमच्या विद्यमान कटिबद्धतेचा भाग आहे.''
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की विविध उपक्रम आणि सर्वोत्तम प्रोग्राम्सच्या माध्यमातून किया इंडियाने सतत सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचे पालन केले आहे, जेथे विशेषत: देखभाल खर्च आणि भावी रिसेल शक्यतेसंदर्भात उत्तम मन:शांती देत आहे.