न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच निवृत्त होत आहेत. भूषण गवई २३ नोव्हेंबर, २०२५ रोजी सरन्यायाधीश पदातून निवृत्त होत आहेत. त्यामुळे भारताचे पुढील सरन्यायाधीश कोण असणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र आता देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची निवड निश्चित झाली आहे.


सरन्यायाधीश भूषण गवई यांची नोव्हेंबरमध्ये निवृत्ती होणार असल्यामुळे केंद्र सरकारने नियमानुसार पुढील सरन्यायाधीशांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर न्या. सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश होणार असल्याचे मानले जात आहे. न्या. सूर्यकांत यांना १६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.


सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते. या परंपरेनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत हेच पुढील सरन्यायाधीश होतील, असे मानले जात आहे. ही निवड प्रक्रिया औपचारिकरित्या एका महिन्यापूर्वीच सुरू झाली आहे.


कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत?


सध्याच्या सरन्यायाधीशांनंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३ वे सरन्यायधीश म्हणून नियुक्ती होणार आहेत. संवैधानिक, सेवा आणि नागरी कायद्यातील त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. या कालावधीत त्यांनी भारतातील विविध न्यायालये आणि कायदेशीर संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.


हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी हिसार येथील जिल्हा न्यायालयात सराव सुरू केला.


१९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी चंदीगडला गेले, जिथे त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, बँका आणि उच्च न्यायालयातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.



९ जानेवारी २००४ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली.



सध्या ते १२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी