तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सेरेनासह भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.


१९ ते २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्स क्लबची खेळाडू सेरेना म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. मुले आणि मुली या दोन्ही भारतीय संघाने या स्पर्धेत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावून देशाचा मान उंचावला.


या उत्कृष्ट यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सेरेना म्हसकर हिचे तसेच प्रशिक्षक, पालक व स्वराज्य स्पोर्ट्स क्लबच्या व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी ही राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. शासनाकडून अशा प्रतिभावंत खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”


सेरेनाच्या या यशामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून क्रीडाक्षेत्रातील नवोदितांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.


अंतिम फेरीत, दोन्ही भारतीय संघ इराणविरुद्ध आमनेसामने आले, परंतू सामने अगदी वेगळ्या शैलीत झाले. मुलांच्या संघाने कठीण संघर्षाचा सामना केला आणि शेवटी ३५-३२ अशा गुणांसह इराणवर विजय मिळवला. याउलट, मुलींच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत इराणचा ७५-२१ असा जबरदस्त पराभव केला.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या