मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार


मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’ च्या रूपाने साजरा होणार आहे.


अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाऊंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य एकदिवसीय कुस्ती स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.


या स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब ही देशातील कुस्तीची बलाढ्य राज्ये सहभागी होत असून प्रत्येक संघातून ५ पुरुष आणि २ महिला असे एकूण ७ पैलवान आपले कसब पणाला लावणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.


या ऐतिहासिक स्पर्धेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यावेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच जागतिक स्तरावर चमकलेल्या कुस्तीपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.


चार राज्यांची संघ पुढीलप्रमाणे :


मराठा वॉरियर्स (महाराष्ट्र) :
पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट),
रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरे.
महिला : अमृता पुजारी, सोनाली महाडिक


शेर-ए-पंजाब (पंजाब):
करणदीप (पंजाब केसरी), संदीप माने, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादव.
महिला : प्रियंका सिकरवार, शिवानी


हरियाणा शूर (हरियाणा):
अंकुश, अमित, निवान, आकाश, सागर.
महिला : कुसुम दहिया, मोनी गुर्जर.


यूपी योद्धा (उत्तर प्रदेश):
अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानी.
महिला : प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादव.

Comments
Add Comment

Anahat Singh : अनाहत सिंगने इतिहास रचला, पहिल्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश विजेतेपदाला गवसणी

ओटावा : कॅनडातील नायगारा-ऑन-द-लेक येथे झालेल्या २०२६ जागतिक स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिपच्या मुलींच्या

IND vs ZIM T20 2nd Match : भारताचा दमदार विजय! झिम्बाब्वेला ९० धावांनी धूळ चारत मालिकेत २-० ची अभेद्य आघाडी

मुंबई : भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आपले वर्चस्व कायम राखत दुसऱ्या सामन्यात

ICC T20 Rankings Team India : भारतासाठी झिम्बाब्वे मालिका ठरली 'लकी'! ICC टी-२० यादीत भारत पुन्हा एकदा अव्वल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आयसीसी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर झेंडा

Sachin Siwach : राष्ट्रकुल खेळ २०२६: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच 'राऊंड ऑफ १६' मध्ये

ग्लासगो : भारताचा स्टार बॉक्सर सचिन सिवाचने शनिवारी पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये प्रवेश

Common Wealth Games 2026 : पुन्हा डोपिंग प्रकरण, दहा दिवसांत चौथी घटना; भारताला बसला मोठा फटका

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी भारताने १२६ जणांच्या संघाची घोषणा केली. पण भारताच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या