Gold Rate Today: दिवाळीसह छटपूजेमुळे सोन्याच्या मागणीत तुफान वाढ सोने कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा रिबाउंड होत महागले !

मोहित सोमण: काल संध्याकाळच्या रिबाउंडनंतर पुन्हा एकदा सोन्याने नागमोडी वळण घेतले. त्यामुळे जागतिक व्यापारातील संदिग्धता कायम राहिल्याने आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत तुफान वाढ झाली आहे.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२५ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९४ रूपये वाढ झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२५६२ रूपये, २२ कॅरेटसाठी ११५१५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९४ रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेटमागे प्रति तोळा किंमतीत १२५० रूपये, २२ कॅरेटमागे ११५० रूपये, १८ कॅरेटमागे ९४० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२५६२० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ११५१५० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९५२२० रूपयांवर पोहोचले आहेत.


संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटमागे १२५६२ रूपये, २२ कॅरेटसाठी ११५०० रूपये, १८ कॅरेटसाठी ९६२५ रूपयांवर गेले आहेत. आज संध्याकाळी कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सोने निर्देशांक ०.१६% घसरल्याने दरपातळी १२३२५५ रूपयांवर पोहोचली आहे. तसेच जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१९% घसरण झाली. जागतिक मानक (Gold Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.३४% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४११२ औंसवर पोहोचली. वैश्विक पातळीवर सकाळी सोन्याचे दर १.५% पडले होते. या आठवड्यात मागील आठवड्यातील तुलनेत सोने ३% घसरले आहे.


व्हाईट हाऊसने गुरुवारी पुष्टी केली की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील, ज्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार संबंध सुधरतील अशि आशा निर्माण झाली आहे ज्यामुळे सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या धातूवर गुंतवणूकदारांचा यापूर्वी भर पडला होता. मात्र सकारात्मकतेत गोल्ड स्पॉट मागणीत आशावादाने घसरण झाल्याने दर नियंत्रित झाले होते. सकाळीही सोन्यात घसरण झाली होती. मात्र चीन व युएसकडून विविध वक्तव्य सुरु असल्याने गुंतवणूकदारांना अजूनही व्यापारी डीलबाबत साशंकता आहे.


दरम्यान तज्ञांच्या मते, युएस बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी सीपीआय (ग्राहक किंमत निर्देशांक CPI) रीडिंगमुळे चलन सुलभतेवरील सट्टेबाजी बळकट होऊ शकते आणि सोन्याचे उत्पन्न कमी होण्यास मदत होऊ शकते, तर जास्त प्रिंटमुळे डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न वाढू शकते, ज्यामुळे बुलियनच्या किमतींवर परिणाम होईल.' ज्यामुळे बाजारात अधिक चढउतार होऊ शकतो हे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.


गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे की अलिकडच्या किमतीत घट झाली असूनही ते सोन्यावर संरचनात्मकदृष्ट्या तेजीत आहे.
शुक्रवारी डॉलर स्थिर राहिला होता. तज्ञांच्या मते पुन्हा आठवड्याच्या वाढीसाठी निश्चित कारणाने इतर चलने धारण करणाऱ्या खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग होऊ शकते. त्याचाच परिणाम भारतीय सराफा बाजारात आज झाला.


भारतात आज का सोने महागले?


पुढील स्पष्ट केलेल्या वैश्विक कारणांसह देशांतर्गत सणासुदीचा काळ असल्याने ग्राहकांच्या कमोडिटीतील मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्यक्ष सोन्यासह ईपीएफ गुंतवणूकीतही आज वाढ झाल्याने सोन्याची दरपातळी आणखी वाढली. तसेच भारतात छठ पूजा सुरू होताच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली.


'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, १८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान १०० ग्रॅम आणि १० ग्रॅमच्या किमती ८४००० रुपये आणि ८४०० रुपयांनी घसरल्यानंतर ही वाढ झाली. जगभरातील मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने तसेच आज डॉलरमध्ये वाढ झाल्याने, फेडकडून दर कपातीची अपेक्षा असल्याने आणि अमेरिका-चीन व्यापार करार होण्याची शक्यता असल्याने अशा एकत्रित कारणांमुळे आज नफा कमावला जात आहे. भारतात सणासुदीच्या काळात, सोन्याची मागणी वाढते जी आजही कायम आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

सेबीकडून मोठा निर्णय! प्री आयपीओ म्युच्युअल फंड प्लेसमेंटवर बंदी

मोहित सोमण: गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सेबीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या नव्या