८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ


बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे. या आधुनिक श्रावणबाळाने आपल्या ८५ वर्षीय आईला विठुरायाच्या दर्शनासाठी चक्क कर्नाटक ते महाराष्ट्र असे खांद्यावर घेऊन प्रवास सुरू केला आहे. सदाशिव बाणी असे या श्रावणबाळाचे नाव असून तो बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील केम्पट्टी गावातील रहिवासी आहे. त्याने ८५ वर्षीय आई सत्यव्वा यांना घेऊन हा प्रवास सुरू केला आहे.


ऊन, पाऊस आणि वाऱ्याचा सामना करत सदाशिव दररोज तब्बल २० ते २५ किमी चालतो. सदाशिव त्याच्या आईला खांद्यावर घेऊन २ नोव्हेंबरला कार्तिक एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार असल्याचे त्याने सांगितले.


आईला खांद्यावर घेऊन विठूरायाच्या दर्शनाला आणत असलेल्या सदाशिवने सांगितले की, "आपण अशा काळात जगत आहोत, जिथे बरेच जण पालकांना वृद्धाश्रमात सोडून जातात. आपले पालक आपल्याला या जगात आणतात. त्यासाठी त्यांना असंख्य गोष्टींचा त्याग करावा लागतो. मात्र फार कमी जण त्यांच्या त्यागाची जाण ठेवतात. पालकांची सेवा करणे हीच खरी उपासना आहे."


सदाशिव हा कर्मठ विठ्ठलभक्त आहे. आईला खांद्यावरुन विठूरायाच्या चरणी आणण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली, याबाबत त्याला विचारलं असता, तो म्हणाला की, "काही वर्षांपूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केल्यानंतर ही तिर्थयात्रा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्या दिवशी माझ्या आत काहीतरी बदल झाला, असं जाणवलं. त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी दरवर्षी माझ्या आईला विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन जाईन, असं मी ठरवलं. यामुळे मला शांती आणि आनंद मिळला," असं त्यानं स्पष्ट केलं.


Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले