बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने २० जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. मृत्यूच्या दारातून थोडक्यात सुटलेला जयंत कुशवाहा याने या भीषण प्रसंगाचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला.


कुशवाहा म्हणाला, पहाटे साधारण २.३० वाजता बसमध्ये धूर दिसू लागला. काही क्षणांतच आग भडकली. आम्हाला वाटलं बसचा अपघात झाला आहे. बाहेर पाहिलं तेव्हा समोर आणि मागे ज्वाळा उठत होत्या. सर्व प्रवासी झोपेत होते, फक्त काही जण जागे होते. आम्ही सर्वांना ओरडून जागं केलं आणि बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुख्य दरवाजा बंद होता.


कुशवाहा पुढे म्हणाला, मी बसच्या मध्यभागी सीट क्रमांक U-7 वर होतो. खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती अडकली होती. शेवटी आम्ही एकत्र येऊन मागची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. बुक्के, लाथा मारून काचेची खिडकी फोडली आणि वरून उडी मारली. बसमध्ये धूर पसरत होता, श्वास घेणंही कठीण झालं होतं. आम्ही विचार न करता उडी मारली काही डोक्यावर तर काही पाठीवर पडले. पण जिवंत बाहेर पडलो हेच नशिब.


कुशवाहाच्या मते, मागून सुमारे ११ प्रवासी बाहेर आले, तर काही ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी फोडून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. काही मिनिटांतच बचावकार्य सुरू झाले. जखमींना तातडीने बेंगळुरू आणि हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचा इंजिन भाग ओव्हरहिट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर

मुस्लीमबहुल भागात एनडीएची सरशी

पटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस-उबाठा सेनेत कलगीतुरा

अंबादास दानवे यांच्या टीकेला भाई जगताप यांचे प्रत्त्युतर मुंबई  : मतमोजणीदरम्यान बिहारमध्ये कोणाचे सरकार

जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम