दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली. मोदींनी यावेळी सांगितले की, ही फक्त नोकरी नाही, तर 'विकसित आणि आत्मनिर्भर भारत' बनवण्याच्या आपल्या प्रवासाचा हा एक उत्सव आहे.


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदी म्हणाले, "या वर्षीच्या दिवाळीने सर्वांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणला आहे. सणासुदीच्या काळात सरकारी नोकरी मिळाल्याने तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुप्पट आनंद मिळाला आहे." त्यांनी नवीन अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.


मोदींनी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत ११ लाखांहून अधिक नोकरीची पत्रे दिली गेली आहेत. तसेच, त्यांनी 'प्रतिभा सेतू पोर्टल' सुरू करण्याची घोषणा केली, ज्यातून यूपीएससी परीक्षेत निवड न झालेल्या हुशार उमेदवारांना सरकारी आणि खासगी क्षेत्रात संधी मिळेल.

Comments
Add Comment

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि

Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या

मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार,

Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा

मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण

Air Ambulance Crash : झारखंडमध्ये एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात: ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

रांची: झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एका खासगी चार्टर एअर अँब्युलन्सला भीषण

लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची भीती; ISI च बांगलादेशी कनेक्शन उघड

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची

Supreme Court : मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 'सुप्रीम' ब्रेक; ५० टक्के आरक्षण ओलांडलेल्या तिढ्यामुळे २२ जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात