Kalachowki News : मुंबई हादरली! दिवसाढवळ्या भररस्त्यात काळाचौकी परिसरात तरुणीवर चाकूने हल्ला, आरोपीने स्वतःचाही गळा चिरला!

मुंबई : मुंबईतील (Mumbai) काळाचौकी (Kalachowki) परिसरात आज, शुक्रवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर रस्त्यात एका तरुणाने एका तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर चाकू हल्ला (Knife Attack) केला. आस्था नर्सिंग होम (Aastha Nursing Home) परिसरात ही घटना घडली. तरुणी स्वतःला वाचवण्यासाठी नर्सिंग होममध्ये शिरली, परंतु आरोपीने तिथेच तिच्यावर हल्ला केला. आरोपी तरुणाने तरुणीवर चाकू हल्ला केल्यानंतर स्वतःचा गळा चिरून घेतला. यात हल्लेखोर तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलीस या दोघांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तरुणाने हा हल्ला का केला? एकतर्फी प्रेमातून की त्यांच्यात प्रेमसंबंध होते? या आणि इतर अनेक अंगांनी पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.



काळाचौकी घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


ही घटना पोलीस स्टेशनपासून केवळ काही मिनिटांच्या अंतरावर घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळाचौकी पोलीस स्टेशनमधील सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून मृत तरुण आणि जखमी तरुणी यांची ओळख पटवण्याचे काम तसेच गुन्ह्यामागचा नेमका उद्देश शोधून काढण्याच्या दिशेने तपास युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मुंबईसारख्या महानगरात महिला सुरक्षेचा प्रश्न (Women Safety) पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

मुंबईतील स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामांना बोनस, आणखी वाढवून दिली एवढ्या कोटींची रक्कम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात मंजूर झालेल्या वादग्रस्त स्ट्रीट फर्निचरची कामे

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रँचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश