मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. कुख्यात डी-गँगच्या ड्रग्स नेटवर्कशी जोडलेला आणि मुख्य ड्रग्स तस्कर सलीम डोळाचा निकटवर्तीय असलेला आरोपी मोहम्मद सलीम शेख याला दुबईतून अटक करून भारतात आणले आहे. या संपूर्ण कारवाईत तब्बल २५६ कोटींहून अधिक किमतीचा माल आणि १२६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीच्या रॅकेटमध्ये खळबळ पसरली आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम शेख दुबईत लपून बसला होता. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर यूएई पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून भारतात आणण्यात आले. २२ ऑक्टोबर रोजी मुंबई क्राईम ब्रँचने त्याला औपचारिकरीत्या अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी दुर्घटना घडली. 'कावेरी ट्रॅव्हल्स'च्या ...
फेब्रुवारी २०२५ मध्ये क्राईम ब्रँचच्या युनिट-७ ने कुर्ला परिसरातून परवीन बानो गुलाम शेख नावाच्या एका महिलेला ६४१ ग्रॅम मेफेड्रोन आणि १२ लाख २० हजार रोख रकमेसह अटक केली होती. यानंतर परवीनची चौकशी करण्यात आली होती. ज्यात तिने, तिला हे ड्रग्स मिरा रोड येथील साजिद शेख उर्फ डैब्ज याच्याकडून मिळाले असल्याचे सांगितले. या धाग्यावरून पोलिसांनी साजिदला अटक करत त्याच्या घरातून सुमारे ६ कोटी किमतीचे ३ किलो एमडी ड्रग्स जप्त केले. साजिदच्या चौकशीतून या नेटवर्कचे धागेदोरे दुबईपर्यंत पसरल्याचे पोलिसांना समजले. तसेच मोहम्मद सलीम सुहैल शेख हा दुबईतून संपूर्ण ड्रग्स नेटवर्क ऑपरेट करत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु असताना या टोळीचा मेफेड्रोन पुरवठा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इरली गावातून होत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांनी २८ मार्च रोजी सांगलीतील एका फॅक्टरीवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल १२२.५ किलो मेफेड्रोन, ड्रग्स निर्मितीचे साहित्य आणि एक वाहन जप्त करण्यात आले. तसेच फॅक्टरीतून ६ आरोपींना अटक करण्यात आली.