काल २०% अप्पर सर्किटवर तर आज १४% उसळलेला Epack Prefab शेअर 'या' दोन कारणांमुळे चर्चेत

मोहित सोमण:नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही निकालासह बँक ऑफ अमेरिकेने (BoFA) केलेल्या खरेदीच्या ब्लॉक डीलमुळे आज ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजी लिमिटेड (Epack Prefab) कंपनीचा शेअर १४% उसळला आहे. कंपनीने नुकताच तिमाही निकाल जाहीर केला आहे ज्यामध्ये कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Income) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७३४६ दशलक्ष रूपयांवर वाढ झाली होती. कंपनीच्या एकत्रित नफ्यात (Consolidated Profit) इयर ऑन इयर बेसिसवर दुप्पट वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीत १४.४२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला २९.४६ कोटींचा नफा मिळाला आहे. माहितीनुसार, कंपनीच्या एकूण उत्पन्नात गेल्या वर्षीच्या २७०.८२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४३६.७२ कोटींपर्यंत वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ईबीटा (EBITDA) ४५.६% वाढ कंपनीने नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत करोत्तर नफ्यातही (PAT) ६४.४% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १०४.२% वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तिमाहीतील यंदा २९.५ कोटींपर्यंत वाढ झाली आहे.


कंपनीच्या बँलन्स शीटच्या बाबतीत, ICRA ने अलीकडेच कंपनीचे रेटिंग A+ वर अपग्रेड केले आहे, ज्यामध्ये कंपनीने मजबूत आर्थिक परिस्थिती आणि मजबूत ट्रॅक रेकॉर्डचा उल्लेख केला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ आणि आर्थिक वर्ष २०२५ दरम्यान प्रीफॅब व्यवसायात ४६.२% सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) नोंदवला आहे, जो उद्योगाच्या सरासरी ८.३% पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील पहिल्या सहामाहीत तिची ऑर्डर बुक ६५६.६ कोटी रुपये होते.


दरम्यान काल कंपनीच्या इक्विटी शेअरपैकी ५.६२ लाख शेअर बँक ऑफ अमेरिकेने खरेदी केले होते. २३३.८२ रूपये प्रति शेअरसह हा व्यवहार झाला. त्यामुळेच काल कंपनीचा शेअर २०% उसळीसह ५२ आठवड्यातील उच्चांकावर (All time High) वर पोहोचला होता. काल अखेरच्या सत्रात शेअर १३% वाढीसह २२९.९० रूपयांवर बंद झाला होता.१ ऑक्टोबर २०२५ रोजी हा शेअर बाजारात कमकुवत पदार्पण म्हणून आयपीओनंतर सूचीबद्ध झाला होता. त्यामुळे नवीन असलेला हा शेअर १८३.८५ रुपयांवर सवलतीच्या दराने सूचीबद्ध झाला होता जो २०४ रुपयांच्या बेस इश्यू किमतीपेक्षा ९.८७% कमी सूचीबद्ध झाला. ५०४ कोटी आयपीओत ३०० कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि २०४ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी उर्वरित शेअर उपलब्ध होते.


एपॅक प्रीफॅब दोन विभागांमध्ये कार्यरत आहे प्रीफॅब बिझनेस, जो भारत आणि परदेशात टर्नकी स्टील बिल्डिंग सोल्यूशन्स प्रदान करतो आणि ईपीएस पॅकेजिंग बिझनेस, जो विस्तारित पॉलिस्टीरिन-आधारित उत्पादने तयार करतो. कंपनीने तिच्या मम्बट्टू सुविधेत नवीन कंटिन्युअस सँडविच पॅनेल लाइनसह तिची उत्पादन क्षमता देखील वाढवली आहे. तिच्या तीन प्लांटमध्ये, एपॅकची प्री-इंजिनिअर केलेल्या इमारतींसाठी १.२६ लाख एमटीपीए उत्पादन क्षमता आणि ५.१ लाख चौरस मीटर सँडविच इन्सुलेटेड पॅनेल आहेत.


आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत, कंपनीचे एकूण उत्पन्न ७३४.६ कोटी रुपये होते, तर कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) महसूल ७२९.३ कोटी रुपये होता. ईबीटा इयर ऑन इयर बेसिसवर ४५.६% वाढून ८०.९ कोटी रुपये झाला होता आणि करोत्तर नफा (PAT) ६४.४% वाढून ४५.४ कोटी रुपये झाला, ज्यामुळे ऑपरेशनल कार्यक्षमता आणि सुधारित मार्जिन अधोरेखित झाले. या कालावधीत कंपनीचा करपूर्व नफा (पीबीटी) ६०.४ कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. दुपारी १२.५१ वाजेपर्यंत कंंपनीचा शेअर ९.२९% उसळत २५३.६३ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज लिमिटेडची स्थापना १९९९ मध्ये झाली होती. प्री-फॅब बिझनेस, ज्यामध्ये ते ग्राहकांना टर्नकी आधारावर संपूर्ण उपाय प्रदान करते, ज्यामध्ये भारतात आणि परदेशात प्री-इंजिनिअर स्टील इमारती, प्री-फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स आणि त्याचे घ टक (प्री-फॅब बिझनेस) डिझाइन, उत्पादन, स्थापना आणि उभारणी समाविष्ट आहे, आणि भारतातील बांधकाम, पॅकेजिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तू (ईपीएस पॅकेजिंग बिझनेस) यासारख्या विविध उद्योगांसाठी विस्तारित पॉलिस्टीरिन शीट्स आणि ब्लॉक्स (ज्याला ईपीएस ब्लॉक मोल्डेड उत्पादने आणि ईपीएस शेप मोल्डेड उत्पादने असेही म्हणतात) चे उत्पादन कंपनीत समाविष्ट आहे.

Comments
Add Comment

प्रहार शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची अखेर शेअर बाजारात घसरणीने! मेटल शेअर तेजी एफएमसीजी, बँक शेअरने रोखली अस्थिरतेचा 'असा' गुंतवणूकदारांना फटका

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची व बाजारातील आठवड्याची अखेर घसरणीने झाली. दुपारनंतर

Dr Sampada Munde Case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 'खासदार कनेक्शन'! सुसाईड नोटमध्ये अत्याचाराचा उल्लेख

डॉ. संपदा मुंडेंच्या पत्रात खासदाराचाही उल्लेख, फलटण प्रकरणात मोठी अपडेट समोर सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण

संगीतकार सचिन संघवीला अटक: तरुणीवर अत्याचार आणि गर्भपाताचे आरोप

मुंबई : बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या गायक आणि संगीतकार सचिन संघवी याच्याविरुद्ध एका २९ वर्षांच्या तरुणीने

सकाळी आठवड्यातील सर्वाधिक घसरण संध्याकाळी रिबाऊंडसह पुन्हा 'कमबॅक' सोन्यात जबरदस्त दरवाढ !

मोहित सोमण:आज शुक्रवारी सकाळी घसरलेल्या सोन्याने संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. घसरलेल्या

सध्याच्या परिस्थितीतील सोन्यात नफा उचलण्यासाठी चॉइस म्युच्युअल फंडकडून नवा Gold ETF फंड लाँच!

प्रतिनिधी:जागतिक परिस्थितीतील सोन्यातील वाढीचा लाभ उठवण्यासाठी गुंतवणूकदारांना एक नवा पर्याय प्राप्त होणार

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप