सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झालेला विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार, सोशल मीडियात चर्चा

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अ‍ॅडलेड येथे सुरू आहे. या सामन्यात तसेच आधी झालेल्या पर्थमधील सामन्यात विराट कोहली शून्य धावा करुन बाद झाला. सलग दोन एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्य धावा करुन बाद झाला.लागोपाठ दोन वेळा अपयशी ठरलेला विराट कोहली कसोटी आणि टी २० पाठोपाठ एकदिवसीयक्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.





विराट कोहली १७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच लागोपाठच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्य धावा करुन बाद झाला आहे. अ‍ॅडलेडच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने विराटला बाद केलं. सुरुवातीपासूनच कोहली क्रीझवर संघर्ष करताना दिसत होता. त्याच्या खेळात आत्मविश्वासाची कमतरता जाणवत होती. त्यामुळे आता कोहलीसाठी ही मालिका निर्णायक ठरू शकते, कारण भारत सध्या संघ बांधणीच्या टप्प्यात आहे.

ज्या अ‍ॅडलेडच्या मैदानावर कोहलीने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत त्याच ठिकाणी तो अपयशी झाला. पण चाहत्यांनी त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीची आठवण ठेवून कोहली पॅव्हेलियनमध्ये जात असताना उभं राहून आदराने टाळ्या वाजवल्या.


आता मालिकेत फक्त एकच सामना उरला असून, कोहलीसमोर स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची हीच संधी आहे. अन्यथा, भारतीय संघात बदलाच्या काळात त्याला जागा टिकवणे कठीण ठरू शकते. सलग दोन ‘डक’नंतर विराटला या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करणे गरजेचे आहे, अन्यथा हा नकोसा विक्रम त्याच्या कारकिर्दीवर काळी छाया टाकू शकतो.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर