शेअर बाजारात टेक्सटाईल शेअर्समध्ये १६% रॅली कापड कंपन्यांना का मिळतोय आज प्रतिसाद जाणून घ्या...

मोहित सोमण:आगामी प्रलंबित भारत व युएस यांच्यातील बहुप्रतिक्षित करार लवकरच होईल अशी अटकळ शेअर बाजारात बांधली जात आहे. परिणामी आज शेअर बाजारात या रॅलीचा सर्वाधिक फायदा आज टेक्साटाईल शेअरला बसला आहे. सकाळच्या स त्रातील सुरुवातीला हे शेअर १६% पर्यंत उसळल्याचे दिसून आले. प्रामुख्याने भारताने युएसशी प्रस्ताव मान्य केल्यास ५०% टॅरिफ थेट १५ ते १६% पर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः टेक्साटाईलवरील टॅरिफ ५०% वरून खाली येत १६% प र्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे युएसकडून आकारण्यात आलेल्या टॅरिफमुळे सर्वाधिक नुकसान कापड उद्योगाला व कापडाच्या निर्यातीत झाले होते. त्यामुळे हा संभाव्य फायदा लक्षात घेता गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात या टेक्साटाईल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिला.


विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधल्यानंतर आणि दोन्ही नेत्यांनी व्यापार वाटाघाटींमध्ये चांगल्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर राजनैतिक पातळीवर पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. सकाळच्या स त्रात वेलस्पून लिविंग, इंडोकाऊंट इंडस्ट्रीज, केपीआर मिल्स, ट्रायडंट, वर्धमान टेक्सटाईल, आलोक इंडस्ट्रीज, गरवारे, रेमंड लाईफस्टाईल, अरविंद लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली आहे. अमेरिकेने या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५% कर लादला होता. त्यामुळे चामड्याच्या वस्तूंसह सर्वाधिक नुकसान या टेक्साटाईल क्षेत्राला झाला.विद्यमान कर दुप्पट करून ५०% केला असल्यान कापड क्षेत्रावर दबाव पडल्याने निर्यात घटली होती. आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण कापड निर्यातीपैकी जवळजवळ ३०% वाटा अमेरिकेचा आहे. त्यामुळे या निर्णयाला अधिक महत्व प्राप्त झाले.


प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कापड, औषधनिर्माण आणि अभियांत्रिकी उत्पादनांसह भारतीय वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात कर सवलत मिळू शकते. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या अमेरिकन समकक्षांसोबतच्या अलीकडच्या बैठकींमुळे याबाब त ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान भारत युएसने घातलेल्या रशियन तेलाच्या खरेदीत कपात करण्याच्या अटीवर पुढील धोरण अवलंबिले जाऊ शकते. मात्र संभाव्यता लक्षात घेता आज शेअर बाजाराने टेक्साटाईल क्षेत्राला आज मोठा फायदा करून दिला आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम