मोहित सोमण: नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतच्या ३० दिवसांच्या कालावधीत टाटा मोटर्सने १ लाखांहून अधिक वाहनांच्या वितरणासह एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३३% वाढ विक्रीत कंपनीने नोंदवली आहे. कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे की,' एसयूव्ही मालिका या वाढीचे नेतृत्व करत असून नेक्सॉन (सप्टेंबर २०२५ मध्ये भारतातील क्रमांक १ विक्री होणारी कार) ने ३८००० हून अधिक विक्री नोंदवत ७३% वाढ साधली, तर पंचने ३२००० युनिट्सची विक्री करत २९% वार्षिक वा ढ (YoY) दर्शवली आहे.'
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा यांनी सांगितले की,'आमच्या ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) पोर्टफोलिओ नेही दमदार कामगिरी केली असून या काळात १०००० हून अधिक ईव्हींची विक्री झाली ज्यात ३७% वाढ झाली आहे. आमच्या संपूर्ण कार आणि एसयूव्ही पोर्टफोलिओने या वाढीला अधिक बळ दिले असून उत्पादन नेतृत्व, बाजारातील प्रासंगिकता आणि उत्कृष्ट वितरण या आमच्या धोरणात्मक वचनबद्धतेला पुन्हा अधोरेखित केले आहे.' या यशस्वी कामगिरीमुळे आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात सकारात्मक प्रवाह कायम राहील, असा आम्हाला विश्वास आहे. यावर्षी नियोजित असलेल्या नव्या आणि आकर्षक लाँचेससोबत सोबतच ग्राहकांचा वाढता उत्साह आमच्या पुढील प्रवासाला अधिक वेग देईल असेही कंपनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यापूर्वी १७ ऑक्टोबरला टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (TMPV) कंपनीने आपल्या टाटा नेक्सॉनची विक्रमी विक्री होणारी कार ठरल्याचे आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.
केवळ दसरा व दिवाळी दरम्यान या सणासुदीच्या काळात १०००० हून अधिक इलेक्ट्रिक कारची विक्री केली जी ३७% वार्षिक केली. टाटा नेक्सन ईव्ही आणि टाटा पंच ईव्ही व्यतिरिक्त, कंपनीच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये टाटा टियागो ईव्ही, टाटा टिगोर ईव्ही, टाटा कर्व ईव्ही आणि टाटा हॅरियर ईव्ही यांचाही समावेश आहे. एकूण कंपनीच्या चारचाकी विक्रीत टाटा एसयूव्हीचा वाटा जवळपास ७०% असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळी ते नवरात्री ३८००० हून अधिक युनिट्सची किरकोळ विक्री झाली आहे. या काळात टाटा नेक्सन सर्वाधिक विक्री होणारी टाटा कार ठरली आहे ज्यामध्ये वार्षिक (YoY) ७३% वाढ झाली. त्यानंतर टाटा पंचचा क्रमांक लागतो वार्षिक विक्रीत टाटा पंचने २९% वाढ नोंदवली आहे. विशेषतः या आकडेवारीत टाटा नेक्सन ईव्ही आणि टाटा पंच ईव्हीचे किरकोळ विक्रीचे आकडे देखील समाविष्ट आहेत.