प्रतिनिधी:जागतिक बँक असलेल्या आयएमएफच्या (International Monetary Fund IMF) वार्षिक बैठकीदरम्यान झालेल्या एका कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) न्यू यॉर्कस्थित ग्लोबल फायनान्सकडून दोन जागतिक किर्तीचे दोन प्रतिष्ठि त पुरस्कार मिळाले आहेत. देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या बँकेला जगातील 'World Best Consumer Bank 2025 (सर्वोत्तम ग्राहक बँक २०२५) 'आणि Best Bank in India 2025 (भारतातील सर्वोत्तम बँक २०२५) असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. ही दुहेरी मान्यता एसबीआयची नाविन्यपूर्णता, आर्थिक समावेशन (Financial Inclusion) आणि ग्राहक उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध जागतिक बँकिंग नेता म्हणून स्थिती मजबूत करते, असे एसबीआयने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे.
तंत्रज्ञानाचे नेतृत्व राखून आणि भारताच्या विविध भौगोलिक परिदृश्यात सेवांचा विस्तार करत, तिच्या विस्तृत ग्राहक आधारावर जागतिक दर्जाचे बँकिंग अनुभव देण्यात बँकेच्या यशाची दखल हे पुरस्कार घेतात, असेही त्यात म्हटले आहे. याविषयी बोलताना एसबी आयचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी म्हणाले आहेत की की, '५२ कोटी ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि दररोज ६५००० नवीन ग्राहक जोडण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे. 'डिजिटल फर्स्ट, कंझ्युमर फर्स्ट' बँक म्हणून, आमचे प्रमुख मोबाइल अँप्लिकेशन १० कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देते, ज्यांचे दररोज १ कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत.'
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही बँकेच्या पुरस्कारानंतर त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. '२०२५ च्या सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार सोहळ्यात ग्लोबल फायनान्स, न्यूयॉर्कने स्टेट बँक ऑफ इंडियाला तिच्या उत्कृष्ट सेवेसाठी आणि जगभरातील ग्राहकांच्या विश्वासासा ठी दोन प्रतिष्ठित पदकांनी सन्मानित केल्याबद्दल अभिमान आहे.' असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.'या सन्मानाबद्दल संपूर्ण एसबीआय कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन. आर्थिक समावेशनासाठी एसबीआयची दृढ वचनबद्धता आणि समाजाच्या प्रत्येक घटकाची सेवा करण्यासाठीचे त्यांचे सततचे प्रयत्न हे भारताच्या विकासाच्या कथेला पुढे नेण्यात ती किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे याचा पुरावा आहे' असे गोयल पुढे म्हणाले आहेत.