मोहित सोमण: अखेरच्या सत्रात सुरूवातीच्या रॅलीला मात्र चाप बसला आहे. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर हलक्या तेजीत झाली असली तरी सकाळच्या सत्रातील रॅली टिकवण्यात बाजाराला अपयश आले आहे. त्यामुळे सलग सहा सत्रात झालेल्या मोठ्या रॅलीला आज काहीसा ब्रेक लागला. गुंतवणूकदारांकडून आगामी युएस भारत व्यापारातील पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगली गेल्याने शेअर बाजारात आज किरकोळ वाढ झाली. सेन्सेक्स १३०.०६ अंकांनी उसळत ८४५५६.४० पातळीवर व निफ्टी २२.८० अंकांनी उसळत २५८९१.४० पातळीवर स्थिरावला आहे. सकाळच्या बँक निर्देशांकातील वाढीत घसरण झाल्याने निर्देशांक सपाट पातळीवर स्थिरावला. सकाळी वाढलेले मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाल्याने एकत्रितपणे देशांतर्गत गुंतवणूकदारांचे अ खेरीस काहीसे नुकसान झाले.
व्यापक निर्देशांकातील आज मिडकॅप ५० (०.०९%), मिड कॅप १०० (०.०६%), मिड कॅप १५० (०.१५%), मिड स्मॉल कॅप ४०० (०.१८%), स्मॉल कॅप २५० (०.२४%) अशा जवळपास सर्वच निर्देशांकात घसरण झाली आहे. सुरूवातीच्या कलातच सकाळी अस्थिर ता निर्देशांक ५.३०% पेक्षा अधिक पातळीवर गेल्याने संभाव्य धोका यापूर्वीच स्पष्ट झाला होता. मात्र अखेरच्या सत्रात तो किरकोळ घसरत ३.८५% रोखला गेला. परिणामी बाजारात मर्यादित सपोर्ट लेवल मिळाली.याशिवाय निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आयटी (२.२१%), खाजगी बँक (०.४९%), मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (०.८३%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३१%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडस्मॉल हेल्थकेअर (०.६४%), हेल्थकेअर (०.३३%), तेल व गॅस (०.५७%) निर्देशांकात झाली आहे.
आज जागतिक स्तरावर युएस भारत यांच्यातील अनिश्चित व्यापाराबाबत घरगुती गुंतवणूकदारांसह परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) नवी गुंतवणूक रोखली जात असल्याने बाजारात चढा ट्रेंड दिसू शकला नाही. तसेच तिमाहीतील मिश्र आकडेवारीचा परिणामही शेअर बाजारात जाणवत आहे. एकीकडे आयटी शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे फायनांशियल सर्विसेस शेअरला गुंतवणूकदारांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. बाजारातील सहभागींनी प्रसारमाध्यमांना असे नमूद केले की आयटी आ णि खाजगी बँकांमधील तेजीला उत्पन्नातील आशावाद, क्षेत्रीय ताकद आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूक यांचा पाठिंबा होता, तर तेल, दूरसंचार आणि काही लार्जकॅप समभागांमध्ये विक्रीचा दबाव वाढण्यावर मर्यादा घालत होता. सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पा तळीच्या जवळ राहिल्याने गुंतवणूकदारांची भावना सावधपणे सकारात्मक राहिल्याचे स्पष्टपणे बाजारात झळकले असून दिवसभरात चढउतार सुरू होत अस्थिरता सुरूच राहिली.
एकंदरीत, गुरुवारच्या सत्रात आयटी, बँकिंग आणि एफएमसी जी क्षेत्रांच्या नेतृत्वाखाली निवडक बाजारातील तेजी दिसून आली, तर मिडकॅप, स्मॉलकॅप आणि काही लार्ज-कॅप समभागांना नफा मिळवून देण्याचा सामना करावा लागला. गुंतवणूकदारांना क्षेत्रीय ट्रें ड, कमाईचे अपडेट आणि जागतिक संकेत पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण बाजार मिश्र क्षेत्रीय गतीसह विक्रमी उच्चांकाच्या जवळ जात आहे.
जागतिक पातळीवरील युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील अस्थिरता, सरकारचे शट डाऊन, वाढलेली महागाई, बेरोजगारी आकडेवारी याआधारे गुंतवणूकदारांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे ज्यामध्ये तिन्ही बाजा रात नुकसान झाले आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सकाळप्रमाणेच मिश्रित भावना कायम होत्या. अखेरीस सर्वाधिक वाढ जकार्ता कंपोझिट (१.४७%), स्ट्रेट टाईम्स (०.५१%), हेंगसेंग (०.५१%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मात्र निकेयी २२५ (१.३१%), कोसपी (०.९९%), तैवान वेटेड (०.४२%) निर्देशांकात झाली आहे. युएसने रशियन कच्च्या तेलाच्या दोन कंपन्यावर निर्बंध लावल्याने कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात परिणाम झाला. दिवसभरात ३ ते ४% कच्चे तेल उसळले आहे. भूराजकीय पातळीवरील अस्थिरता काहीशी कमी झाल्याने सोन्याच्या चांदीच्या दरात घसरण झाली. रूपयांच्या बाबतीत आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७ पैशांनी वाढ झाल्याने भारतीय चलनी बाजार स्थिर राहण्यास मदत झाली.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एससीआय (७.९३%), बिर्लासॉफ्ट लिमिटेड (७.७१%), वर्धमान टेक्सटाईल (७.१४%), वोडाफोन आयडिया (७.१४%), केपीआर मिल्स (५.७८%), इन्फोऐज इंडिया (४.७७%), भारत फोर्ज (४.५६%), बँक ऑफ इंडिया (४.० ५%), आयईएक्स (३.८७%), इन्फोसिस (३.८१%), इंद्रप्रस्थ गॅस (३.५४%), बजाज होल्डिंग्स (३.२४%), बंधन बँक (३.२१%), पिरामल फार्मा (३.२०%), आयडीएफसी फर्स्ट बँक (२.५१%) समभागात झाली आहे. आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण गॉडफ्रे फिलिप्स (६.९१%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (५.४९%), फोर्स मोटर्स (५.०८%), पुनावाला फायनान्स (४.९०%), एथर एनर्जी (४.२४%), एसबीएफसी फायनान्स (३.४८%), अदानी पॉवर (३.२३%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.१७%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.०७%), एमआरपीएल (२.९६%), इटर्नल (२.८८%), होम फर्स्ट फायनान्स (२.८२%), अनंत राज (२.५९%) समभागात झाली आहे.