बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऐन तारुण्यात बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करूनही त्याला जी प्रसिद्धी आणि यश मिळाले नव्हते, ते यश आणि लोकप्रियता आता साठीच्या उंबरठ्यावर उभे असताना मिळत आहे. 'आश्रम' (Aashram Web Series) या वेब सीरिजमधील 'बाबा निराला'ची नकारात्मक भूमिका असो किंवा 'ॲनिमल' (Animal) चित्रपटातील त्याची दमदार एन्ट्री, बॉबी देओल एका नव्या आणि प्रभावी रुपात प्रेक्षकांसमोर आला आणि सर्वांना खूप भावला. नुकताच तो आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या प्रोजेक्टमध्येही दिसला होता. 'आश्रम' या सीरिजमध्ये बॉबी देओलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले असले तरी, त्याच्या भूमिकेबाबत जी गोष्ट सर्वाधिक चर्चिली गेली, ती म्हणजे त्याने दिलेले बोल्ड (Bold) आणि इंटिमेट सीन्स (Intimate Scenes). विशेषतः, सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्तासोबतच्या (Esha Gupta) त्याच्या रोमँटिक दृश्यांनी चाहत्यांना थक्क केले होते. या बोल्ड दृश्यांचे शूटिंग कसे केले गेले, याबद्दल नेहमीच चर्चा रंगायची. अशातच, आता खुद्द बॉबी देओलने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याने कबूल केले आहे की, ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन्स शूट करताना त्याची अवस्था खूपच वाईट (अस्वस्थ) झाली होती. यामुळे, पडद्यावर आत्मविश्वासपूर्ण दिसणारा 'बाबा निराला' प्रत्यक्षात मात्र इंटिमेट सीन्स शूट करताना खूपच अस्वस्थ होता, हे स्पष्ट झाले आहे.
'मला घाम फुटलेला, मी खूप नर्व्हस...नेमकं काय म्हणाला बॉबी देओल?
'आश्रम' (Aashram) वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्तासोबत (Esha Gupta) दिलेले बोल्ड आणि इंटिमेट सीन्स कसे शूट केले, याचा अनुभव खुद्द अभिनेता बॉबी देओलने सांगितला आहे. 'स्पॉटबॉय'शी बोलताना बॉबीने शूटिंगदरम्यान आपली झालेली अवस्था कबूल केली. बॉबी देओल म्हणाला की, "ईशा गुप्ता एक अत्यंत व्यावसायिक अभिनेत्री आहे आणि ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळते. मात्र, जेव्हा आम्ही या इंटिमेट सीनचं शूटिंग करत होतो, तेव्हा मी खूप नर्व्हस झालो होतो आणि घाबरलो होतो. मला अक्षरशः घाम फुटलेला होता." यावेळी ईशा गुप्ताने त्याला मदत केली. बॉबीने सांगितले की, "ईशाने मला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी माझे सीन्स चांगल्या प्रकारे देऊ शकलो. मला वाटते म्हणूनच लोकांनाही ते सीन्स आवडले." आश्रम ३' (Aashram 3) मध्ये बॉबी आणि ईशा यांच्यातले अनेक इंटिमेट सीन्स होते, ज्यामुळे या सीझनने सर्वाधिक लक्ष वेधले. आता चाहते या वेब सीरिजच्या पुढील सीझनची (Next Season) आतुरतेने वाट पाहत आहेत.