'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता सीजन २ सह परत आली आहे. यावेळी ही मालिका यातील कथा ही नात्यांपुरता किंवा त्या मालिकेच्या पात्रांपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि तांत्रिक मुद्द्यांना देखील हात लावणार आहे.

पहिल्यांदाच बिल गेट्स भारतीय टीव्ही शो मध्ये दिसणार आहेत. बिल गेट्स लवकरच आपल्याला एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ या हिंदी मालिकेत पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांइतकेच मालिकेतील कलाकारही बिल गेट्स सोबत काम करण्यास, त्यांना भेटण्यास उत्सुक आहेत.

स्टार प्लस वरील नवीन प्रोमो मध्ये स्मृती इराणी यांची व्यक्तिरेखा तुलसी विराणी व्हिडीओ कॉल वरून कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे बिल गेट्स.

एका वृत्तानुसार बिल गेट्स हे हिंदी मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ या हिंदी मालिकेत पाहुणे म्हणून येणार आहेत. स्मृती इराणी याबद्दल एक मुलाखतीत म्हणाल्या की भारतीय मनोरंजनासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महिला आणि मुलांचे आरोग्य बऱ्याच काळापासून मुख्य प्रवाहाच्या चर्चेतून बाहेर राहिले आहे. हे एक पाऊल ते बदलण्यासाठीचा एक मोठा प्रयत्न, जगातील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व भारतीय टीव्ही मालिकेत दिसणे ही केवळ एक सहकार्याची बाब नाही तर ती जागरूकता आणि बदलाची सुरुवात आहे.

बिल गेट्स हे २४ व २५ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडस मध्ये दिसणार आहेत. हे दोन्ही एपिसोड पूर्णपणे आरोग्याच्या जागरुकतेवर लक्ष केंद्रित करतील विशेषतः गर्भवती महिला आणि नवजात शिशूंच्या आरोग्याच्या बाबतीत, बिल गेट्स यांचा हा कॅमिओ बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या भागीदारीतून तयार करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज

‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

मुंबई : सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी

श्रेया घोषालच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी! ओडिसाच्या बाली यात्रेला गालबोट

ओडिसा: सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे १३ नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता.

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप!

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय