बिग बींच्या जावयाचा जुहूमध्ये २८ कोटींचा आलिशान फ्लॅट...

मुंबई : मुंबईतील जुहू येथील आलिशान अपार्टमेंटची तब्बल २८ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. गुरुवारी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी हा व्यवहार झाला. या आलिशान अपार्टमेंटचे मालक हे बिझनेसमन निखिल नंदा आहेत. निखिल नंदा म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचे जावई आहेत.


निखिल नंदा यांनी जुहूमध्ये घेतलेल्या या नवीन अपार्टमेंटची किंमत २८.३९ कोटी रुपये आहे. या व्यवहारासाठी १. ७० कोटींचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्यात आले. यामध्ये निखिल नंदाची बहीण नताशा नंदा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी वापरून हा व्यवहार केला. घराचे क्षेत्रफळ ३१३९ चौरस फूट असून ४११ चौरस फुटांची टेरेस देखील आहे. त्यामुळे एकूण जागा सुमारे ३५५० चौरस फूट होते. या अपार्टमेंटसोबत तीन गाड्यांसाठी पार्किंगची जागा देखील आहे.



कोण आहेत निखिल नंदा ?


निखिल नंदा हे एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते आधी दिल्लीत राहत होते, पण त्यांचा मुलगा अगत्स्य आणि मुलगी नव्यनवेली नंदा हे मनोरंजन विश्वात सक्रिय होत असल्यामुळे आता मुंबईत जास्त वेळ घालवत आहेत. यासाठी त्यांनी जुहूत नवे घर विकत घेतले आहे. अगत्स्यने अलिकडेच 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.


निखिल नंदा हे अमिताभ बच्चनचे जावई, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांचे मेहुणे, तर श्वेता नंदा यांचे पती. याशिवाय त्यांची दुसरी ओळखही आहे. निखिल नंदा हे दिवंगत अभिनेत्री आणि निर्मात्या रीतू नंदा आणि राजन नंदा यांचे पुत्र आहेत. रीतू नंदा या महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांच्या कन्या होत्या. त्यामुळे निखिल नंदा हे कपूर कुटुंबाचे देखील सदस्य आहेत. निखिल आणि श्वेता यांना अगत्स्य नंदा आणि नव्यानवेली नंदा अशी दोन मुले आहेत. पूर्वी हे कुटुंब दिल्लीत राहत होते. मात्र, आता अगत्स्य आणि नव्या दोघेही त्यांच्या कामामुळे मुंबईत जास्त दिसतात.


Comments
Add Comment

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

राम चरणच्या अंदाजात आणि ए.आर. रहमानच्या सुरावटीची जादू; ‘पेड्डी’चं पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित!

राम चरणच्या आगामी पेड्डी चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान आता त्याचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय

मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे,