Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना घडली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पोशाख परिधान करून आलेल्या एका युवकास तेथील सुरक्षा रक्षकाने फोटो काढण्यास मज्जाव (Prohibited from taking photos) केला. एवढेच नव्हे तर, या सुरक्षा रक्षकाने त्या युवकाला हिंदीतून बोलण्याचा आग्रह धरला. सुरक्षा रक्षकाने आपल्याला मराठी भाषा येत नाही असे स्पष्टपणे सांगत, एका प्रकारे माज दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवरायांच्या वेशभूषेत आलेल्या त्या युवकाचा संताप अनावर झाला. त्यानंतर, मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या आणि हिंदीचा आग्रह धरणाऱ्या त्या सुरक्षा रक्षकाला युवकाने चांगलेच फैलावर घेतले. या घटनेमुळे ऐतिहासिक किल्ल्यावर मराठी भाषेचा आदर आणि स्थानिक अस्मिता या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे.



नेमकं काय घडलं?




'मला मराठी येत नाही' म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा शिवरायांच्या वेशातील तरुणाने उतरवला माज


दिवाळीच्या लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja) दिवशी वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यावर (Vasai Fort) झालेल्या दीपोत्सव (Deepotsav) कार्यक्रमादरम्यान हा वादग्रस्त प्रसंग घडला. 'किल्ले वसई मोहीम परिवार' आणि 'अनाम प्रेम महाराष्ट्र' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शेकडो दिवे लावून ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता. त्यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आलेल्या एका युवकाला तेथील सुरक्षा रक्षकाने हटकले. त्या सुरक्षा रक्षकाने त्या तरुणाला हिंदीतून बोलण्याचा आग्रह धरला आणि "मला मराठी येत नाही" असे बोलून माज दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाच्या या भूमिकेमुळे शिवरायांच्या वेशात आलेल्या युवकाचा पारा चढला. त्याने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगलेच झापले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो युवक स्पष्ट शब्दांत म्हणताना दिसतो, "मराठी येत नाही का तुला? मराठी आलीच पाहिजे, मराठी येत नाही म्हणायचा आणि माज दाखवायचा हे चालणार नाही!" मराठी भाषेबद्दल आदर राखण्याचे स्पष्ट मत मांडत त्या युवकाने या सुरक्षा रक्षकाचा माज उतरवला. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा घडवून आणत आहे.



'महाराजांच्या गड-किल्ल्यांवर अशी मनाई खपवून घेणार नाही!'


छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वसई किल्ल्यावर (Vasai Fort) आलेल्या युवकाने, आपल्याला फोटो काढण्यास मज्जाव करणाऱ्या आणि हिंदीचा आग्रह धरणार्‍या सुरक्षा रक्षकाला ठाम शब्दांत सुनावले. युवकाने सुरक्षा रक्षकाला खडसावून विचारले, "छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो काढण्यास मज्जाव का करता? महाराजांच्या गड-किल्ल्यांवर (Forts) अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही." या संपूर्ण प्रसंगामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी भाषेचा अपमान: सुरक्षारक्षकांकडून स्थानिक मराठी भाषेचा अपमान होत आहे का? महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान (Respect for Marathi Language) राखला जातो का? या घटनेला 'दुःखद बाब' मानून अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर युवकाच्या ठाम भूमिकेचे कौतुक केले आहे. एका उद्ध्वस्त संसाराला पुन्हा सजीव करण्याचा संकल्प आहे,” असं या उपक्रमाचं सार सांगत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता नव्या उमेदीनं नवजीवनाचं स्वागत करत आहेत.

Comments
Add Comment

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल

'महाराष्ट्र सागरी मंडळाच्या इमारतीला आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावेत'

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: एमपीसी बैठकीच्या पूर्वसंध्येला बाजारात जोरदार 'रिबाऊंड' सकाळची घसरण लार्जकॅपने वाचवली!सेन्सेक्स १५८.६१ अंकांने व निफ्टी ४७.७५ उसळला

मोहित सोमण: आज मजबूत फंडामेंटल आधारे शेअर बाजारात झालेली वाढ उद्याच्या आरबीआयच्या रेपो दरातील औत्सुक्याचे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

बॅलेरिना नृत्यांगना ते २९ वर्षांची जगातील सर्वात तरुण अब्जाधीश उद्योजिका लुआनाची जिगरबाज गोष्ट

मोहित सोमण वयाच्या २९ व्या वर्षी अब्जाधीश होणे शक्य आहे का? आहे हा पराक्रम एका ब्राझीलीयन मुलीने करून दाखवला आहे.