"लिट्ल दीपिकाचा" फर्स्ट लुक पाहिलात का ? दीपिका-रणवीरने पहिल्यांदाच मुलगी ‘दुआ’चे फोटो केले शेअर.

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एका गोंडस कन्येचे आई-बाबा आहेत, हे जरी सर्वांनाच माहीत असलं, तरी त्यांच्या लाडक्या ‘दुआ’चा लुक चाहत्यांना अजून पाहता आला नव्हता. एका वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दीपिका-रणवीरने आपल्या मुलीचा पहिलाच फोटो जगासमोर दाखवला आहे आणि तोही खास दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर!



दीपिका आणि रणवीरने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फॅमिली फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघंही पारंपरिक पोशाखात झळकत आहेत आणि त्यांच्या मांडीवर असलेली छोटीशी ‘दुआ’ सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. तिचं निरागस हास्य, तिचे खळीदार गाल आणि तिचा साधेपणातला गोंडसपणा पाहून अनेकांनी "लक्ष्मीचं रुप" असं तिचं वर्णन केलं आहे.


फोटोंमध्ये दुआने लाल व गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिच्या आई-वडिलांसोबत ट्विनिंग केले आहे. विशेष म्हणजे तिच्या गालांवर दिसणाऱ्या खळ्या, डोळे आणि नाजूक चेहऱ्याचे भाव पाहून चाहत्यांना ती अगदी दीपिकाची प्रतिमा वाटत आहे. "ही तर लिटल दीपिका आहे!" अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.


दुआने दोन लहान पोनीटेल बांधल्या आहेत, ज्या तिच्या निरागसतेला अजूनच गोड रूप देतात. तिच्या केसांतील रिबन, तिचा नखशिखांत पारंपरिक लूक आणि चेहऱ्यावरचं सौम्य हास्य, हे सर्व पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.


या फोटोंवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलिया भट्टने "ओ माय गॉड, ती इतकी गोंडस आहे!" अशी कमेंट केली, तर करण जोहरने "नवीन स्टार पदार्पणासाठी तयार!" असं लिहिलं आहे. अनेकांनी दीपिका आणि रणवीरचं पालकत्व कौतुकाने पाहिलं आहे.


दिवाळी म्हणजे नवीन सुरुवातीचा सण. अशात दीपिका-रणवीर यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा जगासमोर आणून चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र

Dhurandhar Advance Booking : विक्रम मोडण्यासाठी 'धुरंधर' सज्ज! रणवीर सिंहच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापूर्वीच मोठं वादळ, केली छप्पडफाड कमाई

रणवीर रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) उत्तम अभिनयाची चुणूक 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमांमधून सर्वांनी

सूरजच्या लग्नातील धमाल जान्हवीला भोवली, थेट रूग्णालयात दाखल! पोस्ट करत म्हणाली, नजर...

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न झाले. सूरज चव्हाणच्या

मला या गोष्टी आवडतात... श्रेयस अय्यरसोबतच्या डेटींग चर्चांवर मृणालचे उत्तर

मुंबई: बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी