दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नटरंगच्या १५ वर्षांनंतर येणार हा नवा चित्रपट ; दिगदर्शक रवी जाधव यांची घोषणा

मुंबई : नटरंग हा मराठी चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील गाणी आणि लावणी याची आजही प्रेक्षकांना भुरळ पडते. नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते आणि निर्मिती झी स्टुडिओजची होती. या अभूतपूर्व यशाला १५ वर्षे पूर्ण होत असतानाच नव्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांची टीम २०२६ मध्ये एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. 'फुलवरा' असे या चित्रपटाचे नाव आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियातून नव्या चित्रपटाची घोषणा केली. नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


तमाशा फडावरचे कलाकार मंचावर येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. पण त्यांचं खरं आयुष्य हे पडद्यामागे आहे आणि ते अतिशय अस्वस्थ करणारे असे आहे. यावर प्रकाश टाकणारे 'द फोक आख्यान' हा लोककलाविष्कार बघितला. त्या सादरीकरणाने भारावलेल्या रवी जाधव यांनी याच विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचा विचार सुरू केला, त्यातूनच 'फुलवरा' हा चित्रपट जन्माला आला.


'द फोक आख्यान' या बद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, हे ज्याच्या लेखन आणि निवेदनांन सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास हा थक्क करणारा आहे. आणि हर्ष- विजय या तरुण जोडगोळीला असलेली संगीताची जाण ही सुद्धा कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला थोडाफार अनुभव एकत्र आला आणि फुलवराची गोष्ट निर्माण झाली. अश्या प्रकारची गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर झी स्टुडिओज पेक्षा दुसरं उत्तम माध्यम नाही. त्यामुळे आम्ही नटरंग नंतर जवळपास १५ वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. दिवाळी हा सण परंपरा जपणारा आहे, साजरा करणारा आहे त्यामुळे या दिवाळीचा शुभ मुहूर्त साधून आम्ही या सिनेमाची घोषणा केली.


'फुलवरा' या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा - पटकथा आणि संवाद, गाणी ही ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष - विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवेलकर ( झी स्टुडिओज) आणि मेघना जाधव ( अथांग कॉम्युनिकेशन ) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हि गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे आणि ही गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षक उत्सुक आहेत. पुढल्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Comments
Add Comment

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

राम चरणच्या अंदाजात आणि ए.आर. रहमानच्या सुरावटीची जादू; ‘पेड्डी’चं पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित!

राम चरणच्या आगामी पेड्डी चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान आता त्याचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय

मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे,

मराठी चित्रपटात झळकणार सलमान आणि संजूबाबा; कोणती भूमिका करणार, पहा...

मुंबई : बॉलीवूड क्षेत्र गाजवणारा सलमान खान आता लवकरच मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या मराठी