कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघात ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, असे उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकरणात खळबळ निर्माण झाली आहे.


विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उबाठा गटाला 'जय महाराष्ट्र' करत महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये आता रत्नागिरी मतदारसंघातील नेताही भाजपमध्ये जाणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.




उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत," असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, "महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

Comments
Add Comment

इच्छुकांच्या ह्दयात धडधड आणि पोटात भीतीचा गोळा; माजी नगरसेवकांसह सर्वांचे देवाला साकडे

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी सोडत मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार : वडेट्टीवार

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची

शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख भाजपच्या वाटेवर

डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची