ऐन दिवाळीत हापूसची पहिली पेटी देवगडहून दाखल

लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर वाशीत विक्रीला सुरुवात


देवगड  : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली. या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.


पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली. वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालामार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून, विक्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधीही, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता.

Comments
Add Comment

साडेतीन वर्षातच मेट्रो डब्ब्यांना गंज; एमएमआरडीएच्या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर कोट्यवधी

येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाआघाडीचे तीन तेरा वाजणार : आशिष शेलार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मुस्लिम महापौर करायचा आहे का ? विशिष्ट धर्माच्या

मुंबईच्या शाळेने न्यायालयाचा आदेश धुडकावला! 'त्या' कुत्र्यांना आश्रयस्थानी पाठवण्यास 'ट्युलिप स्कूल'चा नकार

मुंबई: साकीनाका येथील ट्युलिप इंग्लिश स्कूल या शाळेने अलीकडील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यास नकार देत

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या, १२ नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू करणार

रेड फोर्ट स्फोटानंतर 'शाह' ॲक्शन मोडमध्ये! गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी रेड फोर्टजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर,

New DSP NFO Launch: डीएसपी म्युच्युअल फंडाकडून ईटीएफसह इतर फंडातील एक्सपोजरसाठी Passive रेंजमध्ये वाढ !

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निर्देशांकाद्वारे गुंतवणूकदारांना भारतातील लार्ज आणि मिडकॅप संधींमध्ये