कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!



ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस केवळ सरींच्या स्वरूपात नव्हता, तर त्याने वादळी वाऱ्यांसह, विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेऊन शहरात रौद्ररूप धारण केले.

संपूर्ण राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, कल्याणकरांसाठी हा पाऊस अनपेक्षित होता. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्यमिश्रित धांदल उडाली. शहरात इतका मुसळधार पाऊस झाला की, सखल भागांत पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. यासोबतच, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडे आणि होर्डिंग्ज कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. आकाशात विजांचा कडकडाट इतका मोठा होता की, अनेक लोक घाबरून घरात सुरक्षित ठिकाणी थांबले.

वादळी हवामान आणि जोरदार पावसामुळे कल्याणच्या बहुतांश भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले. कल्याणप्रमाणेच बदलापूर आणि अंबरनाथ या शेजारच्या शहरांमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग केली. या अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली, तसेच सणाच्या उत्साहात तात्पुरता खंड पडला. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Comments
Add Comment

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक