'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठी घटना! दिग्दर्शक रितेश देशमुखने दिलेले वचन केले पूर्ण

सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव होते. साताऱ्यात शूटींग सुरु असताना नदीत बुडून सौरभचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सौरभच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे रितेशने आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी रितेशने दिवाळीमध्ये सौरभच्या आईकडे त्याच्या इन्शुरन्सची रक्कम हस्तांतरित केली आहे. या मदतीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी रितेशचे आभार मानले आहेत.


“ज्या दिवशी इन्शुरन्स कंपनीने क्लेमचे पैसे पाठवले, त्याच दिवशी सौरभ शर्माच्या आईच्या अकाऊंटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यात आले. रितेशच्या या कृतीचं आम्ही कौतुक करतो. सौरभच्या कुटुंबीयांसाठी त्याने केलेल्या मदतीतून त्याची माणुसकी स्पष्टपणे दिसून येते”, असे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे त्यांनी म्हटले आहे.


साताऱ्यातील संगम माहुली परिसरात रितेशच्या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू होते. या गाण्यात हळदीचे दृश्य असल्यामुळे शूटींगमध्ये सर्वांच्या अंगाला आणि कपड्यांना हळद लागली होती. त्यामुळे जवळच नदी असल्याने सर्वजण नदीवर अंघोळीसाठी गेले होते . या नदीमध्ये भोवरे होते सौरभला या गोष्टीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडायला लागला. यानंतर दोन दिवस सौरभचा शोध सुरू होता. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

Comments
Add Comment

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

राम चरणच्या अंदाजात आणि ए.आर. रहमानच्या सुरावटीची जादू; ‘पेड्डी’चं पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित!

राम चरणच्या आगामी पेड्डी चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान आता त्याचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोग दुबईला होणार स्थायिक! मुलीच्या भविष्यासाठी घेतला भारत सोडण्याचा निर्णय

मुंबई: दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे. त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे,

मराठी चित्रपटात झळकणार सलमान आणि संजूबाबा; कोणती भूमिका करणार, पहा...

मुंबई : बॉलीवूड क्षेत्र गाजवणारा सलमान खान आता लवकरच मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या मराठी