मुंबई : सारेगमप लिटिल चॅम्प्स या स्पर्धेमुळे रोहित घराघरात पोहोचला. या शो यामध्ये तो फायनलिस्ट ठरला होता. यानंतर काही वर्षांनी रोहित आपल्याला इंडियन आयडॉल हिंदी गायनाच्या स्पर्धेतही दिसला. आजच्या घडीला मराठी इंडस्ट्री मधला सर्वात चांगला गायक म्हणून रोहित राऊत ओळखला वाजतो. बऱ्याच चित्रपटात त्याने गाणी गेली आहेत. तसेच अनेक अल्बम साँग पण केले आहेत. आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याने आपल्या चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे.
रोहित राऊत त्याच्या रील मध्ये म्हणतोय नमस्कार मी रोहित राऊत... मी बरीच वर्ष गाणी गातोय, तुमच्यासमोर परफॉर्म करतोय... तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्यात माझं एक स्वप्न आहे जे मला पूर्ण करायचंय आणि यासाठी मला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. हे स्वप्न मी आणि माझ्या बाबांनी मी लहान असताना पाहिलं होतं. जेव्हा आम्ही दोघं सोनू निगम यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. साडेतीन तास जो माणूस स्वतःची नवनवीन गाणी गातोय आणि लोक त्याला पाहण्यासाठी वेडी आहेत. आयुष्यात तोच क्षण... ती गोष्ट मला साध्य करायची आहे.
कलाकाराला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी कधी कधी स्पर्धेत उतरावं लागत. त्यामुळेच I - Popstar या नव्या स्पर्धेत मी सहभागी होतोय. यासाठी तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळी ओरिजिनल, या पूर्वी कुठेही न ऐकलेली गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. ही स्पर्धा श्रोत्यांसाठी एक पर्वणीच आहे. या शो मध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक हा आपण स्वतः लिहिलेली गाणी सर्वांसमोर सादर करणार आहे. I - Popstar मध्ये सहभागी झाल्यावर तुम्ही सगळे असेच माझ्या पाठीशी राहा आणि ,माझ्यावर प्रेम करत राहा.