किया इंडियाने कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही श्रेणीचा विस्तार केला

नवीन एचटीएक्‍स ई आणि एचटीएक्‍स ई (ER) ट्रिम्‍स लाँच


मुंबई:किया इंडिया देशातील मास कारमेकरने आपल्‍या कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही मॉडेल लाइनअपचा विस्‍तार केला आहे. नवीन ट्रिम्‍स एचटीएक्‍स ई व एचटीएक्‍स ई (ईआर) नुकतेच लाँच केले आहेत. याची किंमत अनुक्रमे १९.९९ लाख रूपये (एक्‍स-शोरूम) आणि २१.९९ लाख रूपये (एक्‍स-शोरूम) आहे असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.


कंपनीच्या निवेदनानुसार, कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकल कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीला बाजारपेठेत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला ज्‍यामधून शाश्वत गतिशीलता सोल्‍यूशन्‍समध्‍ये ग्राहकांची वाढती रूची दिसून येते. हे मॉडेल शहरातील कुटुंबांमध्‍ये आणि प्रबळ कार्यक्षमतेसह स्‍टायलिश, वैशिष्ट्य-युक्‍त इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा शोध घेत असलेल्‍या तरूण व्‍यावसायिकांमध्‍ये देखील लोकप्रिय ठरले आहे.' असे कंपनीने यावेळी नमूद केले.


ग्राहकांचे बहुमूल्‍य अभिप्राय आणि सर्वसमावेशक पसंतींना प्रतिसाद देत किया इंडिया ग्राहकांच्‍या गरजांनुसार डिझाइन करण्‍यात आलेले अधिक पर्याय व वैशिष्‍ट्ये देण्‍यासाठी हे नवीन ट्रिम्‍स लाँच करत आहे असे कंपनीच्या वतीने उत्पादनाविषयी बोलताना स्पष्ट करण्यात आले.


एचटीके+ व एचटीएक्‍स ट्रिम्‍सदरम्‍यान स्थित एचटीएक्‍स ई ट्रिम ४२ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकसह उपलब्‍ध असेल, तर एचटीएक्‍स ई ईआर ५१.४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकसह सुसज्‍ज असेल. एचटीके+ ट्रिमवरील वैशिष्ट्यांव्‍यतिरिक्‍त नवीन ट्रिम्‍समध्‍ये पॅनोरॅमिक सन रूफ, तिन्‍ही रांगांसाठी एलईडी लॅम्‍प्‍स, सर्व खिडक्‍यांसाठी विंडो ऑटो अप/डाऊन, ईसीएम रूम मिरर, वायरलेस चार्जर आणि टू-टोन स्‍टीअरिंग व्हिलसह टिल्‍ट व टेलिस्‍कोपिक अँडजस्‍टमेंट आहे.


अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधेसाठी केबिनमध्‍ये सीट बॅक फोल्डिंग टेबल, एअर-प्‍युरिफायरसह व्‍हायरस प्रोटेक्‍शन, लेदरेट सीट्स, मल्‍टी-कलर मूड लॅम्‍पसह पायाच्‍या ठिकाणी प्रकाश सुविधा आणि सोलार ग्‍लास आहे, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवासादरम्‍यान अत्‍ याधुनिक अनुभव मिळतो.


या उत्पादनाविषयी भाष्य करताना,'आम्‍ही सणासुदीच्‍या काळाचे स्‍वागत करत असताना आम्‍हाला ग्राहकांना विस्‍तारित कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही लाइनअपसह अधिक उत्‍साह व पर्याय देण्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया ईव्‍हीला बाजारपेठेत उत्तम व सकारात्‍मक प्रतिसाद, तसेच ग्राहकांकडून बहुमूल्‍य अभिप्राय मिळाला आहे, ज्‍यामुळे आम्‍हाला नवीन एचटीएक्‍स ई ट्रिम्‍स लाँच करण्‍यास प्रेरणा मिळाली आहे. नवीन भर करण्‍यात आलेले ट्रिम्‍स इलेक्ट्रिक गतीशीलता अधिक सहजसाध्य, आरामदायी व प्र शंसनीय करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, कारण प्रत्‍येक प्रवास खास वाटला पाहिजे,'असे असे विक्री व विपणनाचे (Sales and Marketing) वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व राष्‍ट्रीय प्रमुख अतुल सूद म्‍हणाले आहेत.


' कियाच्‍या प्रबळ ईव्‍ही परिसंस्‍थेच्‍या पाठबळासह हे नवीन ट्रिम्‍स स्‍मार्ट, हरित व उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंगचा, तसेच नाविन्‍यतेचा अनुभव देतात, जो भारतभरातील कुटुंबांना उत्‍साहित करतो' असेही ते पुढे म्‍हणाले.


कंपनीच्या माहितीनुसार,कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांसह एैसपैस डिझाइन, प्रीमियम वैशिष्‍ट्ये आणि दैनंदिन व्‍यावहारिकतेसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २५५ एनएम टॉर्क देणाऱ्या ९९ केडब्‍ल्‍यू व १२६ केडब्‍ल्‍यू मोटरची शक्‍ती अ सलेली ही वेईकल प्रवास व रोड ट्रिप्‍सदरम्‍यान सुलभ कार्यक्षमता देते. ही वेईकल दोन बॅटरी पर्यायांसह येते - ५१.४ केडब्‍ल्‍यूएच (४९० किमी रेंज) आणि ४२ केडब्‍ल्‍यूएच (४०४ किमी रेंज). ही वेईकल फक्‍त ३९ मिनिटांमध्‍ये १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत जलदपणे चार्ज होते. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीमध्‍ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले, जेथे १८ प्रगत वैशिष्‍ट्यांसह सहा एअरबॅग्‍ज, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल (एचएसी) अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. आतील बाजूस ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले, ९० कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये आणि सर्वोत्तम कंट्रोल्‍स विनासायास, कनेक्‍टेड ड्रायव्हिंग अनुभव देतात.


किया इंडिया ईव्‍ही मालकांसाठी प्रबळ सपोर्ट सिस्‍टमसह पहिल्‍या दिवसापासून ईव्‍हीबाबत आत्‍मविश्वास निर्माण करत आहे. सर्वसमावेशक ईव्‍ही परिसंस्‍थेच्‍या माध्‍यमातून किया प्रभावी मालकीहक्‍कची खात्री देत आहे, ज्यामध्‍ये मायकिया अँपवर के-चार्ज प्‍लॅटफॉ र्मच्‍या माध्‍यमातून ११००० हून अधिक चार्जिंग पॉइण्‍ट्स, लाइव्‍ह चार्जर उपलब्‍धता, प्रवासाचे नियोजन आणि किया ईव्‍ही रूट प्‍लॅनरसह सुव्‍यवस्थित पेमेंट पर्यायांची सुविधा आहे. २५० हून अधिक ईव्‍ही-सुसज्‍ज वर्कशॉप्‍स आणि डीसी फास्‍ट चार्जर्स असलेल्‍या १००हू न अधिक डिलरशिप्‍ससह किया प्रत्‍येक ईव्‍ही प्रवासाला सोईस्‍कर व विनासायास करते.


कियाची शाश्वत नाविन्‍यता आणि सखोल युजर सहभागाप्रती कटिबद्धता दृढ करत किया ड्राइव्‍ह ग्रीन किया कनेक्‍ट अँपवरील शाश्वतता-केंद्रित सहभाग प्‍लॅटफॉर्म आहे, जो ईव्‍ही ड्रायव्हिंगमधून पर्यावरणावरील अनुकूल परिणामांना प्रकाशझोतात आणतो. डिजिट ल वृक्षारोपण, ड्राइव्‍ह केलेल्‍या अंतरावर आधारित विकास टप्‍पे आणि कार्बन डायऑक्‍साइड बचत डिस्प्ले या माध्‍यमातून हा उपक्रम डिजिटल नाविन्‍यता आणि हरित गतीशीलता ध्‍येयांना एकत्र आणतो, तसेच पर्यावरणपूरक सवयींना प्रेरित करतो असे कंपनीने अं तिमतः स्पष्ट केले.

Comments
Add Comment

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग

मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली.

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

मुंबई: अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज

Yamaha Motors India EV Launch: यामाहा मोटर्स इंडियाकडून प्रथमच ईव्ही मोटारसायकल लाँच 'या' कारणांमुळे, AEROX-E ECO6, FZ RAVE यांची घोषणा

प्रतिनिधी: यामाहा मोटर्स इंडियाने आपला विस्तार मुख्य शहरांसह इतर टियर २,३ शहरात करण्यासाठी आपली कंबर कसली आहे.