गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण


पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ चर्चेचा विषय बनला आहे. जैन संघटनांमध्ये मोहोळ यांच्याबद्दल असणारा राग, शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका आणि धंगेकरांच्या खोचक टीकेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळांनी दिले आहे. तसेच गोखले बिल्डर्सच्या दोन कंपन्यांमधून मी बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, असेही मोहोळांनी सांगितले.



मोहोळांवर आरोप करणाऱ्या राजू शेट्टींबद्दल बोलताना मोहोळ म्हणाले की, राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी माझ्यावर इतका मोठा आरोप करताना मला विचारायला हवे होते. मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. त्यांना जी माहिती देण्यात आली त्याआधारे त्यांनी माझ्यावर आरोप केले.


Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा