ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर


नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने निघालेल्या तीन युवकांना नियतीने अर्ध्या रस्त्यातच गाठले. मुंबई-रक्सौल कर्मभूमी एक्सप्रेसमधून धावत्या गाडीतून खाली पडून तीन तरुण अपघाताला बळी पडले, ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.



दिवाळीच्या गर्दीमुळे दुर्घटना


सध्या दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेत प्रचंड गर्दी उसळली आहे. या गर्दीमुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवार रात्रीच्या सुमारास नाशिक रोड स्थानकाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली.


मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये तिघे तरुण दरवाजेजवळ उभे होते. नाशिक रोड स्थानकातून गाडी पुढे गेल्यानंतर जेल रोड परिसरातील ढिकले नगरजवळ त्यांचा तोल गेला आणि ते तिघेही धावत्या रेल्वेतून खाली फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


या अपघातात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले, तर तिसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जखमी युवकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


मृत आणि जखमी व्यक्तींकडे कोणतीही ओळखपत्रे नसल्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सणासाठी निघालेले हे तरुण नेमके कोण आणि कुठले, याचा तपास सुरू आहे. मात्र, ऐन सणाच्या काळात ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात करणारी ठरली आहे.



रेल्वे लोको पायलटने दिली माहिती


इतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी तातडीने नाशिकरोड रेल्वे स्थानक कार्यालयात अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह