केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा


नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने केरळमधील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा, वीजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा इशारा दिला आहे. याशिवाय, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाने केरळच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, मल्लप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.शनिवारी उशिरा रात्रीपासून इडुक्की जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील नेदुमकंदम, कमिली आणि कट्टाप्पना या भागांत पूराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. अनेक रस्ते तलावासारखे झाले असून बचाव कार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितरित्या राहत छावण्यांमध्ये हलवले जात आहे. मुल्लापेरियार धरणाचा पाण्याचा पातळी झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.


केरळमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम तामिळनाडूवरही झाला आहे. मुल्लापेरियार धरणाचे 13 दरवाजे 100 सेंटीमीटरपर्यंत उघडण्यात आले असून, सुमारे 1400 क्यूसेक पाणी सोडले गेले आहे. याशिवाय, इतर तीन धरणांमधूनही पाणी सोडण्यात येत आहे. एर्नाकुलममध्ये संपूर्ण रात्र जोरदार पाऊस झाला. यामुळे एर्नाकुलम रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. आजूबाजूच्या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.


पूराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.खराब हवामान लक्षात घेता मच्छिमारांना 22 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


तामिळनाडूमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोयंबटूर जिल्ह्यातील डोंगराळ भाग, तसेच नीलगिरी, इरोड, तिरुप्पूर, थेनी, तेनकासी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमध्ये भारी ते अतिभारी पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

प्रभू श्रीरामांच्या नगरीत इतिहासाची पुनरावृत्ती! अयोध्या दीपोत्सवात दोन नवीन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या, उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा आपल्या 'भव्य आणि दिव्य दीपोत्सवा'मुळे जागतिक

"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह

बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र

पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार

पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमेलगतची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवणार

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली  :केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार