दिव्यांच्या उजेडात नवी उमेद, नवा आनंद, दिवाळी सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा

दिवाळी २०२५ च्या मराठी शुभेच्छा: हिंदू धर्मामध्ये दीपोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून ते बलिप्रतिपदेपर्यंत (पाडवा) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, दुःखावर आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव. या सणामुळे सर्वत्र आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते.


प्रत्येक घर दिव्यांच्या उजेडाने, रांगोळ्यांनी आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघते. घराघरांत फराळाचा सुगंध दरवळतो आणि आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची लगबग सुरू होते. दिवाळी सणानिमित्त आपल्या प्रियजनांना प्रेम, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा पाठवा.



दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा



  1. आनंद होवो overflow मजा कधी होऊ नये Low,
    संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो,
    असा तुमचा दिवाळी सण असो!
    दिवाळी शुभेच्छा २०२५.

  2. अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी
    सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी...
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  3. ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो,
    या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो,
    दिवाळीच्या शुभेच्छा!

  4. सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा..
    नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा..
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  5. जाहला आरंभ आनंद पर्वाला, दीपोत्सव दिवाळी सुरु झाला..
    सप्तरंगात आसमंत उजळला, चैतन्य, उत्साह मनी उसळला..
    धन, आरोग्य, मन:शांति लाभो, याच शुभेच्छा आपणा सर्वांना..
    शुभ दिवाळी!

  6. सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत..
    झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत..
    हि दिवाळी आपणास सुखकारक आणि समृद्धीची जावो..!

  7. सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
    या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
    दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!

  8. उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
    दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
    फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
    नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
    शुभ दीपावली..!

  9. धन त्रयोदशी !! नरक चतुर्दशी !!
    लक्ष्मी पूजन !! बलि प्रतिपदा !! भाऊबीज !!
    आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
    शुभ दीपावली..!

  10. अंधारवाटा उजळून निघाल्या
    दीपावलीच्या या दिनी
    सदैव मंगल होवो सर्वांचे
    हीच कामना मनी!
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments
Add Comment

येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाआघाडीचे तीन तेरा वाजणार : आशिष शेलार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मुस्लिम महापौर करायचा आहे का ? विशिष्ट धर्माच्या

मुंबईच्या शाळेने न्यायालयाचा आदेश धुडकावला! 'त्या' कुत्र्यांना आश्रयस्थानी पाठवण्यास 'ट्युलिप स्कूल'चा नकार

मुंबई: साकीनाका येथील ट्युलिप इंग्लिश स्कूल या शाळेने अलीकडील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यास नकार देत

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या, १२ नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू करणार

रेड फोर्ट स्फोटानंतर 'शाह' ॲक्शन मोडमध्ये! गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी रेड फोर्टजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर,

New DSP NFO Launch: डीएसपी म्युच्युअल फंडाकडून ईटीएफसह इतर फंडातील एक्सपोजरसाठी Passive रेंजमध्ये वाढ !

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निर्देशांकाद्वारे गुंतवणूकदारांना भारतातील लार्ज आणि मिडकॅप संधींमध्ये

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या