"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह काही तरुणांना मद्यपान करताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात शहरातील प्रसिद्ध व्यापारी समीर शाह आणि आणखी एक व्यक्ती अटकेत आहेत.


गुजरातच्या अलथान परिसरातील केएस अवतार हॉटेलमध्ये समीर शाह याने त्याच्या वाढदिवसानिमित्त मोठी पार्टी आयोजित केली होती. पार्टीदरम्यान, समीर शाहचा १९ वर्षांचा मुलगा परिस आणि त्याचे काही मित्र हॉटेलजवळ पार्क केलेल्या गाडीत दारू पित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्वरित घटनास्थळी पोहचले.


पोलिसांनी या तरुणांचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला असता परिस आक्रमक झाला आणि पोलिसांशी झटापट करू लागला. त्याने पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


या गोंधळादरम्यान परिसचे वडील समीर शाह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांशी बोलताना "माझी वरच्या अधिकाऱ्यांशी ओळख" असल्याचा उल्लेख करत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, दोन महिला घटनास्थळी आल्या आणि परिसला "लहान मुलगा आहे" म्हणून सोडण्याची विनंती करत होत्या.


पोलिसांनी वाहनाची तपासणी करताना ९ दारूचे कॅन, ७ मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच, शिकाऊ चालकाचा "L" स्टिकर असलेली गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना झोन ४ च्या पोलिस उपायुक्त निधी ठाकूर यांनी सांगितले:
"दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, एक दारू जप्ती प्रकरण आणि दुसरा पोलिसांवर हल्ला. दारू पुरवणाऱ्या डिलिव्हरी मॅनला अटक करण्यात आली असून, त्याने समीर शाह यांच्या सूचनेवरून दारू आणल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे समीर शाहलाही अटक करण्यात आली आहे."


पुढे त्या म्हणाल्या, "परिसच्या श्वास चाचणीत (ब्रेथ एनालायझर) त्याने दारू पिल्याचे निष्पन्न झाले. त्याचे रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नोटीस पाठवायची की अटक करायची, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल."


@6536973795366 pls check

Comments
Add Comment

'डॉक्टर मॉड्यूल'चा देशव्यापी दहशतवादी कट उघड; अल-कायदा, जैश-ए-मोहम्मदची लिंक

नवी दिल्ली: रेड फोर्टजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामागे कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध

रेड फोर्ट स्फोट ‘दहशतवादी हल्ला’ घोषित!

केंद्र सरकारने निषेधाचा ठराव केला नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक रेड फोर्टजवळ झालेल्या कार स्फोटाला केंद्र

दिल्ली स्फोटात जैशचे कनेक्शन, ६ डॉक्टर, २ मौलवी आणि १८ अटकेत

दिल्ली स्फोटाच्या तपासाचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे नेतृत्व नवी दिल्ली : दिल्लीत लाल

पीएम मोदी 'ॲक्शन मोड'मध्ये! भूतानमधून येताच केली बॉम्बस्फोटातील जखमींची विचारपूस, सायंकाळी तातडीची CCS बैठक

सुरक्षेवरील कॅबिनेट समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१२ नोव्हेंबर,

Delhi Blast : दिल्ली नव्हे, तर राम मंदिर टार्गेट होतं, लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दहशतवाद्यांनी राम मंदिरावर...

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला असून, अनेक

लाल किल्ला ब्लास्ट : 'आत्मघाती' नव्हे, 'अपघाती' स्फोट; तपास कुठे पोहोचला? १० पॉइंट्समध्ये जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण