अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण अनेकदा ऐकले आहे. साखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. बऱ्याचदा डॉक्टर साखर न खाण्याचा सल्लाही देतात. मात्र साखर न खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे आपल्याला माहित नसते.
विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांना साखरेपासून लांबच राहावे. मात्र साखर खाल्याने मधुमेह सोडून इतर कोणत्या समस्या उद्भवतात, हे आपल्याला माहित नसते. अनेकदा आपल्याला या समस्या उद्भवतात, मात्र हे साखरेमुळे होत आहे याबद्दल आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे जाणून घेऊया साखरेमुळे शरीरावर काय परिणाम होतात.
दिवाळी २०२५ च्या मराठी शुभेच्छा: हिंदू धर्मामध्ये दीपोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून ते बलिप्रतिपदेपर्यंत (पाडवा) हा सण मोठ्या ...
जास्त साखरेचे सेवन केल्याने टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साखरेमुळे वजनात वाढ होते. जे शरीरासाठी हानिकारक ठरते. तसेच हृदयरोग, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि दात किडण्याची शक्यता अधिक असते. त्वचेचे वृद्धत्व वाढणे, मूड बिघडणे असेही प्रकार साखरेमुळे अनुभवास येतात. मात्र हा त्रास साखरेमुळे होतोय, याची जाणीव आपल्याला नसते.
या आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही फक्त २१ दिवस साखर खाणे बंद करा. साखर खाणे बंद केले तरी ताजी फळे खाऊन अथवा मर्यादीत प्रमाणात उसाचा रस पिऊन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकता.
कृत्रिम साखर न खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन वाढत नाही. साखरेचे सेवन बंद केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. ज्यामुळे आयुष्यभर मधुमेहाच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही. साखर न खाल्ल्याने त्वचा देखील चांगली होण्यास मदत होते. अशाप्रकारे साखर खाणे बंद केल्यास अनेक फरक शरीरात दिसतात.