प्रतिनिधी: लवकरच फरार उद्योगपती मेहुल चौक्सी भारतात परतणार का या अटकळी सुरू झाल्या आहेत. भारत सरकारने यासंदर्भात मोठे यश प्राप्त केले आहे. हिरा व्यापारी मेहुल चौक्सीच्या प्रत्यार्पणाला (Extradition) बेल्जियम येथील न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी चौक्सी भारतात परतण्याची शक्यता आहे. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार, मेहुल चौक्सी याविरोधात न्यायालयात अपील करू शकतो. अद्याप याविषयी अतिरिक्त माहिती उपलब्ध झालेली नाही. ए का प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अँटवर्प न्यायालयाने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान्यता देत प्राथमिक आदेश दिला आहे. मेहुल चोक्सी त्याविरुद्ध अपील करू शकतो' असे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले आहे. १२ एप्रिल २०२५ रोजी मेहुल चौक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने वेळोवेळी विशेष पाठपुरावा परदेशी तपास यंत्रणांना केला होता. २०१८ साली मेहुल चौक्सीने देश सोडला होता. फरार निरव मोदी हा मेहुल चौक्सीचा पुतण्या आहे.
भारतीय एजन्सी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी मेहुल चौक्सीला अटक केली होती. २०१८ मध्ये भारतातून पळून गेल्यापासून तो अँटिग्वामध्ये राहत होता आ णि त्याचे भारतीय नागरिकत्व वैध असल्याचे सांगितले जात असतानाही त्याने कॅरिबियन राष्ट्राचे नागरिकत्व घेतले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये, तो वैद्यकीय उपचार घेण्यासाठी बेल्जियममध्ये पोहोचला असे वृत्त आहे.भारतीय एजन्सींनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना त्यां च्या प्रत्यार्पणाच्या विनंतीचा भाग म्हणून २०१८ आणि २०२१ मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयाने जारी केलेले किमान दोन ओपन-एंडेड अटक वॉरंट प्रदान केले आहेत.
चोक्सी, त्याचा पुतण्या नीरव मोदी, कुटुंबातील अनेक सदस्य, कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांसह, २०१८ मध्ये सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये नाव देण्यात आले होते. पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत लेटर ऑफ अंडरटेकिंग (Lo U) जारी करणे आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट (FLC) मध्ये फेरफार करणे यासह मोठ्या प्रमाणात कर्ज फसवणुकीशी संबंधित आरोप आहेत.