पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव


मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेपूर्वी संपूर्ण मालिकेत खेळाडूंच्या कामगिरी आणि विक्रमांची चर्चा आता रंगू लागली आहे. तसेच पर्थमध्य पाऊल ठेवताच विराट आणि रोहित यांनी कोणतीही विश्रांती न घेता थेट नेटमध्ये सराव सुरू केला. जास्तीत जास्त वेळ खेळाडूंसह नेटमध्ये खर्च केला. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पर्थमध्ये दाखल झाला असला तरी सर्व लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आजवर रोमांचक लढती होत आल्या आहेत. १९८० ते २०२५ पर्यंत, या दोन्ही संघांनी एकूण १५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये अनेक सामने संस्मरणीय राहिले आहेत.भारताच्या नवीन एकदिवसीय तसेच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की कर्णधार शुभमन गिल सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग ७८४ आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याचे रेटिंग ८४७ पर्यंत पोहोचले. त्यानंतरही, इतर कोणताही फलंदाज त्याला मागे टाकू शकला नाही आणि तो अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. आता, गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मोठ्या खेळी खेळून त्याचे रेटिंग वाढवण्याची आणखी एक संधी असेल. तसेच माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. काही काळापूर्वी तो दुसऱ्या स्थानावर होता; परंतु आता तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रोहित शर्माचे सध्याचे रेटिंग ७५६ आहे. २०१९ मध्ये, जेव्हा तो त्याच्या शिखरावर होता, तेव्हा तो ८८२ च्या रेटिंगवर पोहोचला होता; परंतु आता तो त्यापेक्षा खूपच कमी आहे. रोहित शर्मा बऱ्याच काळानंतर एकदिवसीय सामन्यात खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. ही मालिका त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक असेल. त्याचप्रमाणे विराट तर सध्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. अलिकडेपर्यंत कोहली चौथ्या स्थानावर होता; परंतु आता तो एका स्थानाने घसरला आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहलीचे रेटिंग सध्या ७३६ आहे. तसेच २०१८ मध्ये कोहलीने ९०९ रेटिंग गाठले होते. एकंदरीत या मालिकेनंतर रोहित आणि विराट आयसीसी क्रमवारीत कोणत्या स्थानावर पोहोचू शकतात हे पाहणे मनोरंजक असेल.


कोहलीला विश्वविक्रमाची संधी : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा किंग विराट कोहलीला इतिहास रचण्याची नामी संधी चालून आली आहे. जर विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवले तर तो एक विश्वविक्रम रचणार आहे. विराट कोहलीच्या खात्यावर आधीच ५१ एकदिवसीय शतके जमा आहेत. जर तो शतक झळकावू शकला तर तो जागतिक क्रिकेटमध्ये एकाच स्वरूपात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रचू शकतो.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या