ICICI Bank Q2Results: देशातील क्रमांक दोन खाजगी बँकेचा तिमाही निकाल जाहीर विश्लेषकांचा भाकीताला मागे टाकत बँकेच्या निव्वळ नफ्यात ५.२% वाढ

मोहित सोमण: देशातील क्रमांक दोन खाजगी बँक म्हणून ओळख असलेल्या आयसीआयसीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. बँकेच्या इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ५.२% वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ११७४५.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत बँकेला १२३५८.९ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला. बँकेच्या निकालात अपेक्षित वाढ झाली नसली तरी विश्लेषकांच्या २ ते ३% अंदाजापेक्षा अधिक निव्वळ नफा मिळवण्यात बँक यशस्वी ठरली आहे. बँकेच्या मालमत्ता गु णवत्तेतही (Asset Quality) मध्येही इयर ऑन इयर बेसिसवर सुधारणा झाली आहे ज्यामध्ये जीएनपीए (Gross Non Performing Assets GNPA) इयर बेसिसवर २७१२१.२ कोटीवरून २३८४९.७ कोटींवर घसरले आहे. त्यामुळे जीएनपीए गुणोत्तर १.९७ वरू न १.५८% पातळीवर सुधारले आहे. निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NPA) या श्रेणीत मागील वर्षाच्या ०.४२% तुलनेत यंदा ०.३९% वर सुधारले.


बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २००४८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २१५२९.५ कोटींवर पोहोचले. बँकेच्या एकूण उत्पन्नात (Total Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४७७१४ कोटीवरून ४९३ ३३.५ कोटींवर वाढ नोंदवली. बँकेच्या माहितीनुसार, प्रोव्हिजनल आपात्कालीन तरतुदी (Provision and contingencies) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २६% घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या १२३३ कोटींच्या तुलनेत यंदा तरतूद ९१४ कोटींवर ठेवण्यात आ ली होती. तर बँसेल ३ (Basel III) मधील सीएआर (Capital Adequacy Ratio CAR) इयर ऑन इयर बेसिसवर १५.३५% वरून १५.७६% वर वाढला आहे. उपलब्ध माहितीनुसार, आरओए (Return on Assets) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २.३६% वाढ झाली आहे जी गेल्या वर्षीच्या तिमाहीत २.४०% होती.


इंडसइंड बँकेचे एमडी आणि सीईओ राजीव आनंद निकालामधील निरीक्षण नोंदवताना म्हणाले आहेत की,'


कॉर्पोरेट आणि किरकोळ कर्ज वितरण स्थिर राहिले


मायक्रोफायनान्स वगळता मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली


मायक्रोफायनान्स घसरणीविरुद्ध त्वरित तरतुदी घेतल्या घाऊक ठेवी सोडून दिल्या


मायक्रोफायनान्स वितरणाबाबत सावधगिरी बाळगली


दरम्यान बँकेच्या माहितीनुसार,कासा ठेवी (Current Account to Saving Account CASA Ratio) आर्थिक वर्ष २०२६ मधील दुसऱ्या तिमाहीत ३९.२% होता. सध्या आयसीआयसीआय बँकेच्या देशभरात ७४२५ शाखा आहेत व १०६१० एटीएम अस्तित्वात आ हेत. बँकेने नोंदवले की ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७.००% होते आणि CET-१ प्रमाण स्वतंत्र आधारावर १६.३५% होते, जे अनुक्रमे ११.७०% आणि ८.२०% च्या नियामक आवश्यकतांपेक्षा (Regulatory Requirments) बरेच जास्त होते.

Comments
Add Comment

Bangladesh News : ढाका विमानतळात भीषण आग! विमानतळाचे कार्गो क्षेत्र आगीच्या विळख्यात; धुरामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल

IDBI Q2Results: आयडीबीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल ९८% वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण:आयडीबीआय या आघाडीच्या खाजगी बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ९८% वाढ नोंदवली आहे. प्रामुख्याने

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

HDFC Bank Q2 Results: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा निकाल जाहीर HDFC Bank निव्वळ नफ्यात थेट १०.८% वाढ

मोहित सोमण:देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला आर्थिक निकाल जाहीर केला

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Brahmaputra Apartment Fire : खासदारांच्या 'ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट'च्या पार्किंगला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विश्वंभरदास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये (Brahmaputra Apartment) आज सकाळी भीषण