मोहित सोमण:सलग दोन महिन्यांच्या धुवाधार वाढी नंतर आज सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. एकाच सत्रात सोन्यात ३% घसरण नोंदवली गेली आहे. कालही कमोडिटी बाजार नव्या उच्चांकावर गेले असताना नफा बुकिंगसाठी बाजारात ईपीएफ 'सेल ऑफ' सुरू झाल्याने आज सोन्यासह चांदीत घसरण झाली.विशेषतः थंड जागतिक संकेतानंंतर जागतिक पातळीवरही नवा ट्रिगर नसल्याने बाजारात रॅली झाली नाही.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आज आपले समझोता पू र्ण विधान केल्याने बाजारात काहीशी स्थिरता आली.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १९१ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४४ रूपयांनी घसरण झा ली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३०८६ रुपयांवर, २२ कॅरेटचा ११९९५ रूपयांवर, तर १८ कॅरेटसाठी ९८१४ रूपयांवर पोहोचला आहे.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १९१० रुपयांनी घसरण झाली असून, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १७५० रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३०८६० रूपये, २२ कॅरेटसाठी ११९ ९५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९८१४० रुपयांवर पोहोचले. भारतीय सराफा बाजारात सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३०७६ रूपये, २२ कॅरेटसाठी ११९९५ रुपये, १८ कॅरेटसाठी ९८१४ कोटी रुपयावर पोहोचले. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीए क्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.२५% वाढ झाली व दरपातळी १२७३२० रूपयांवर पोहोचली आहे. आज जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.१२% इतकी घसरण झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.७६% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४२४९.९८ औंसवर गेली आहे.
सोने का घसरलय?
धनत्रयोदशीच्या आधीच्या उच्चांकी पातळीनंतर शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी जुन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जागतिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सतत वाढलेल्या तेजीनंतर जवळजवळ दोन महिन्यांतील ही पहिली च मोठी सुधारणा आहे. सकाळच्या सत्राच्या सुरुवातीला सोन्याने $४,३७९.२९ या नवीन उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर, स्पॉट गोल्ड २.३% घसरून $४२२६.४३ प्रति औंसवर आला. डिसेंबरसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स १.५% घसरून $४२३७.६९ प्रति औंसवर आला होता. बाजारातील रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे,सोने देखील १३२२९४ रुपये प्रति १० ग्रॅम या शिखरावरून ४००० रुपयांनी घसरून १२५९५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. सुमारे ३% झालेल्या घसरणीवर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, अलिकडच्या आठवड्यात झाले ल्या असाधारण वाढीनंतर ही घसरण अपेक्षित होती. बँकिंग आणि बाजार विश्लेषक अजय बग्गा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, ऐतिहासिक तेजीनंतर ही घसरण एक रणनीतिक आणि नैसर्गिक सुधारणा आहे. त्यांनी सांगितले की जागतिक तणाव कमी झाल्यामुळे ही घसरण झाली आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध व्यापार शुल्काबाबत मऊ भूमिका घेतल्यानंतर सुरक्षित-आश्रयस्थान असलेल्या मालमत्तेची अल्पकालीन मागणी कमी झाली.
जागतिक परिपेक्षात सोने आज थंडावले आहे. ज्याचा फायदा आज आशियाई बाजारात जाणवला. रुपयात ७ पैशाने पुन्हा एकदा घसरण झाल्याने भारतीय बाजारात घसरण मर्यादित झाली आहे. मात्र एकूणच जगभरात आज सोने स्वस्त झाले ज्यात नफा बुकिंगचा मोठा समावेश आहे.चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या भेटीपूर्वी अमेरिका-चीन व्यापार संबंधांमध्ये संभाव्य बदलाचे संकेत देणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी असे संकेत दिले की, चिनी वस्तूंवर लादलेले उच्च शुल्क दीर्घकाळ टिकणार नाही.
'ते टिकाऊ नाही' असे ट्रम्प यांनी म्हणत प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सध्याचे शुल्क स्तर कायम राहू शकतात का या प्रश्नावर,'ते टिकू शकते, परंतु त्यांनी मला ते करण्यास भाग पाडले.' असे म्हटले होते. ट्रम्प यांनी दोन आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये शी यांच्याशी भेट घेणार असल्याचे सांगितले आणि असे सुचवले की या भेटीमुळे व्यापार वाटाघाटी होऊ शकतात. 'मला वाटते की चीनसोबत आमचे काही संबंध ठीक असतील.' असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यामुळे एक प्रकारे सोने स्वस्त होण्यास हे तांत्रिक कारण महत्वा चे ठरले.
सोन्यापेक्षाही चांदीच्या दरात घसरण-
चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १३ रूपयांनी, तर प्रति किलो दरात १३००० रुपयांनी घसरण झाली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति १ ० ग्रॅमसाठी १७२० रूपये, तर प्रति किलोसाठी १७२००० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्यासह मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, चांदीच्या किमती १७०४१५ रुपये प्रति किलोवरून १०००० रुपयांपेक्षा जास्त घसरून १५३९२९ रुपये प्रति किलो झाल्या म्हणजेच ८% अधिक घसरण झाली आहे.
सोन्याच्या तुलनेत चांदीत आणखी घसरण झाली. विशेषतः जागतिक अस्थिरतेत सोन्याच्या चांदीच्या दरात वाढ होत असताना आज मात्र सोन्याच्या तुलनेत चांदीत आणखी घसरण झाली. जागतिक पातळीवरील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अनिश्चितता असताना रशिया अमेरिका तसेच अमेरिका चीन यांच्यातील संवाद पुन्हा नरमाईने सुरू झाल्याने सुरक्षित आश्रित गुंतवणूक म्हणून आज चांदीकडे पाहिले गेली नाही. तसेच सिल्वर ईटीएफमधील घसरलेल्या मागणीमुळेही ही घसरण झाली आहे. बाजारातील आक ड्यांनुसार, सकाळच्या सत्रातच चांदी आदल्या दिवशीच्या तुलनेत ८% घसरली आहे. मात्र आज गुंतवणूकीत घसरण झाली असली तरी निश्चतच ती नकारात्मक नाही. केवळ प्राईज करेक्शन दृष्टीने ही तांत्रिकदृष्ट्या घसरण झाल्याचेही तज्ञांचे मत आहे.
गेल्या सहा महिन्यांतील ही एक मोठी घसरण आहे. शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे व्यापार तणावाबाबतची चिंता कमी झाली तर प्रादेशिक बँकांकडून मिळालेल्या ठोस निकालांमुळे शेअर बाजार स्थिर होण्यास आणि बाँड उत्पन्न वाढविण्यास मदत झाली. उच्च दर सामान्यतः बुलियनसाठी नकारात्मक असतात, जे व्याज देत नाहीत. लंडनमधील चांदीच्या बाजारपेठेतील ऐतिहासिक घसरण देखील कमी होण्याची चिन्हे दर्शवित आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफा मिळण्यास चालना मि ळत आहे असे जागतिक तज्ञ म्हणतात.
या आठवड्यात चांदीने नवीन उच्चांक गाठला होता. शुक्रवारी प्रति औंस $५४.५० वर पोहोचला आणि नंतर तो लवकरच खूप वेगाने वाढला होता.सप्टेंबरच्या अखेरीपासून बरेच लोक चांदी खरेदी करत आहेत आणि किमतींमध्ये पुन्हा घट होण्याची शक्यता दर्शवते. गेल्या दोन आठवड्यात लंडनच्या चांदीच्या बाजारात नाट्यमय घसरण झाली आहे, ज्यामुळे न्यू यॉर्कच्या चांदीच्या फ्युचर्सपेक्षा किमती जास्त वाढल्या आहेत आणि व्यापाऱ्यांना अटलांटिक ओलांडून धातूची वाहतूक करण्यास भाग पाडले आहे. लंडनमधील ऐतिहा सिक घसरणीमुळे जगभरात धातूचा शोध सुरू झाला आहे, शुक्रवारी त्याचा एक महिन्याचा वार्षिक कर्ज खर्च सुमारे २०% राहिला आहे असे तज्ञ सांगतात.