कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या मालिकेला आता १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. या सामन्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून सरावालाही सुरुवात झाली आहे. भारतीय संघात कर्णधाराच्या रुपात मोठा बदल झाला तर आता ऑस्ट्रेलिया संघात आता काही बदल झाले आहेत. मालिका सुरू होण्याच्या दोन दिवस आधी दुखापतीमुळे अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मार्नस लाबुशेन संघात समावेश करण्यात आला आहे. स्नायूंच्या ताणामुळे कॅमेरॉन ग्रीनला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या बहुप्रतिक्षित अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन निवडकर्ते कोणताही धोका पत्करण्यास तयार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'कॅमेरॉन ग्रीन रिहेब कालावधी पूर्ण करेल. शेफील्ड शिल्ड सामन्यात क्वीन्सलँडसाठी १५९ धावा करणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनच्या जागी मार्नस लाबुशेनचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. हे लॅबुशेनचे देशांतर्गत हंगामातील चौथे शतक होते.


असा आहे भारत संघ:


शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल.


असा आहे ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, मार्नस लाबुशेन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल ओवेन, मॅट रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुन्नेमन आणि जोश फिलिप.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत