Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने किंवा घरगुती वस्तू खरेदी करून शुभ शुभारंभ करतात, ज्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. परंतु, जर तुम्हाला या धनतेरसला केवळ संपत्तीचेच नाही, तर आरोग्याचे वरदान देखील मिळवायचे असेल, तर भगवान विष्णूंच्या धन्वंतरि अवताराच्या मंदिरात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान धन्वंतरि हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. त्यांची उपासना केल्याने भाविकांना दीर्घायुष्य, निरोगीपणा (उत्तम आरोग्य) आणि मानसिक शांती प्राप्त होते, असे मानले जाते. संपूर्ण भारतात, विशेषतः खालील पाच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये धनतेरसच्या दिवशी विशेष पूजा-अर्चा आणि आरोग्य कामना यज्ञ आयोजित केले जातात.



१. रंगनाथस्वामी मंदिर- श्रीरंगम, तमिळनाडू


तमिळनाडूतील प्रसिद्ध हे मंदिर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असलेल्या भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. धनतेरसच्या शुभदिनी या मंदिरात भगवान धन्वंतरिंची विशेष पूजा आयोजित केली जाते. या पूजेमध्ये औषधी वनस्पतींच्या प्रसादाचा समावेश असतो. हा प्रसाद भक्तांना वाटला जातो, जो त्यांना आरोग्य आणि आयुष्यवृद्धीचं आशीर्वाद देतो.



२. श्री धन्वंतरि आरोग्य पीठम- चेन्नई, तमिळनाडू


चेन्नई येथे असलेले हे प्राचीन मंदिर आरोग्य साधनेचं केंद्र म्हणून ओळखले जाते. धनतेरसच्या दिवशी या ठिकाणी विशेषतः आरोग्यपूजा आणि आयुर्वेदिक मंत्रोच्चार केले जातात. भक्तगण मोठ्या श्रद्धेने भगवान धन्वंतरिला औषधी वनस्पतींच्या माळा अर्पण करतात. या ठिकाणी पूजन केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते, अशी प्रबळ श्रद्धा आहे.



३. धन्वंतरि मंदिर- तिरुमला, आंध्र प्रदेश


तिरुमला येथील हे धन्वंतरि मंदिर आपल्या अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जेसाठी आणि आरोग्यदायी स्पंदनांसाठी प्रसिद्ध आहे. धनतेरसच्या निमित्ताने येथे “धन्वंतरि होमम” नावाचा मोठा विधी केला जातो. या होममद्वारे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि सर्व नागरिकांना रोग-व्याधींमधून सुटका मिळावी म्हणून सामूहिक प्रार्थना केली जाते.



४. थोट्टुवा धन्वंतरि मंदिर- केरळ


केरळ राज्यातील थोट्टुवा हे ठिकाण भगवान धन्वंतरिंच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे स्वतः भगवान धन्वंतरि वास करतात, अशी स्थानिक श्रद्धा आहे. धनतेरसच्या काळात येथे हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने येथे पूजा केल्यास त्यांना आरोग्यसंपन्न जीवन लाभते, असा भक्तांचा विश्वास आहे.



५. श्री पद्मनाभस्वामी मंदिर – तिरुवनंतपुरम, केरळ


हे जगातील सर्वाधिक संपन्न मंदिरांपैकी एक असून येथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना केली जाते. धनतेरसच्या दिवशी या मंदिरात 'स्वर्ण पुष्प अर्चना' (सोन्याच्या फुलांची पूजा) केली जाते.भक्तांच्या मते, या विशेष पूजेमुळे जीवनात स्थायी समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते.



६. धन्वंतरी मंदिर, नेल्लुवाई


भारतातील प्राचीनतम धन्वंतरि मंदिरांमध्ये नेल्लुवाईच्या धन्वंतरि मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या मंदिराची उत्पत्ती सुमारे ५००० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. अशी मान्यता आहे की, या मंदिरातील भगवान धन्वंतरिंची मूर्ती अश्विनी देव यांनी स्वतः स्थापित केली होती. विशेष म्हणजे, या मूर्तीची पूजा स्वयं देवी लक्ष्मीने (Goddess Lakshmi) केली होती, त्यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक आहे.


धनतेरस हा केवळ संपत्ती खरेदी करण्याचा दिवस नाही, तर आरोग्य, आयुष्य आणि आंतरिक समाधानाचा उत्सव आहे. या दिवशी भगवान धन्वंतरिच्या मंदिरात जाऊन आरोग्यसंपन्न जीवनाची प्रार्थना करणं, म्हणजेच खऱ्या अर्थाने धनाची प्राप्ती करून घेणे होय.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन