मुंबई : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच शाहिद कपूर हा सध्या त्याच्या कॉकटेल २ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये असला व्यस्त असला तरी चर्चा होते ती बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'फर्जी २' या वेबसिरीजची, याच संबंधित एक बातमी समोर आलीय आहे . शाहिद कपूर नवीन वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये फर्जी २ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आणि याच वेब सिरीज साठी त्याने मोठं मानधन आकारल्याचं समोर आल आहे.
फर्जी २ साठी शाहिद कपूरच मानधन
सध्या फर्जी २ या वेब सिरीज च्या लेखनाचं काम चालू आहे. आणि राज - डिके या दिग्दर्शकांची जोडी मिळून २०२६ मध्ये शूटिंगला सुरवात करणार आहेत. शाहिदने या शूटिंग साठी ६ महिन्यांचा कालावधी दिला आहे. फर्जी च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले असल्याने शाहिद ने आपल्या मानधनात वाढ केल्याचे समोर आले आहे. शाहिद ने 'फर्जी २' या वेबसिरीज साठी तब्बल ४० कोटी मानधन आकारले असून, शाहिदच्या करिअर मधली ही सगळ्यात जास्त फी आहे.
फर्जी २ केव्हा प्रदर्शित होणार
फर्जी नुसार हि वेबसिरीज २०२६ च्या शेवटी म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात किंवा २०२७ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. हा सिझन पाहिल्या सिझन पेक्षा भव्य दिव्य असेल. प्रेक्षक ही सिरीज 'अमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्म वर पाहू शकतील.
शाहिद कपूर च्या प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचे झाल्यास
तो ' देवा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होते.सध्या तो विशाल भारद्वाज दिग्दर्शित ; ओ रोमिओ' मध्ये भूमिका साकारतोय. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डे निमित्त १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटर यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या शिवाय कॉकटेल २ यामध्ये तो रश्मीका मंदाना आणि क्रिती सेनॉन सोबत झळकणार आहे.