ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान,साठवणुकीतील कांदा सडणे आणि बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.काही ठिकाणी तर उत्पादन खर्चही निघणेही कठीण झाले आहे.ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या आर्थिक संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी उन्हाळ कांद्याची अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली व त्या कांद्याला कमीत कमी ४००/- जास्तीत जास्त १४००/- तर सरासरी १०७५/- रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला,मात्र उत्पादन खर्च प्रति किलो १० ते १५ रुपये होत असल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

दि १७ ऑक्टोबर पासून पुढील सात दिवस दिवाळीनिमित्त लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने व सणासुदीला हातात दोन पैसे राहावेत,यासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणल्याने पर्यायाने आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादनासाठी झालेला उत्पादन खर्च देखिल वसूल होत नाही.कांद्याच्या दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवणूक करून ठेवला आहे.मात्र हा कांदा देखील आता बदलत्या वातावरणामुळे सडत आहे.या संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे.सचिन होळकर,कृषी तज्ञ लासलगाव

कोणतीही वस्तू उत्पादन करतांना त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार कारखानदार,व्यापारी यांना आहे तर मग अथक कष्ट करून पिकविलेल्या कांद्यासह इतर शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आम्हाला का नाही ? कांद्याला किमान प्रती क्विंटल २२०० ते २५०० रुपये मिळेल अशी व्यवस्था सरकारने करावी.

Comments
Add Comment

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात