फक्त दशावतार, दशावतार आणि दशावतारचं! सहाव्या आठवड्यातही शोज हाउसफ़ुल्ल

मुंबई : कोकणच्या खेळाला, संस्कृतीला चित्रपटांच्या मोठ्या पडदयावर दर्शवणारा सिनेमा म्हणजे 'दशावतार' , १२ सप्टेंबर २०२५ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला, आणि त्या दिवसापासून प्रेक्षकांनी दिलेल प्रेम हे अजूनही कमी होत नाही आहे. आजही सकाळी ७. ३० ते रात्री ११:५५ पर्यंत शोज हाउसफ़ुल्ल जात आहेत, ही मराठी चित्रपटासाठी आनंदाची गोष्ट आहे.


मागील महिन्याभरापासून बॉक्स ऑफिसवर दशावतार या मराठी चित्रपटाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कोकणातील अस्सल मातीत तयार झालेला दशावतार हा चित्रपट हिंदी सिनेमानाही कांटे कि टक्कर देतोय.


दशावतार या सिनेमाने सहाव्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. प्रेक्षकांच्या या भरगोस प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आणि सकाळचे ७.३० ते रात्री ११.५५ चे शोज हाऊसफुल्ल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


या बद्दल एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलंय "दशावताराचा आज सहावा आठवडा सुरु झाला आहे. आज ही महाराष्ट्राच्या अनेक चित्रपटगृहांमध्ये अनेक शोज हाऊसफुल्ल आहेत. जगभरात अजूनही शोज लागत आहेत, लोक त्याला तितकाच प्रतिसादही देत आहेत, खऱ्या अर्थाने लोकाश्रय लाभलेला हा चित्रपट ठरलाय, त्यातल्या गुणदोषांसकट प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर धरलयं, आणि हृदयात स्थानही दिलयं. पुढे ते लिहितात की हे कोणा एकाच यश नसून, आमच्या २५० जणांच्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन हे कमावलंय.आणि झी स्टुडियोच्या टीमने हा चित्रपट सर्वदूर पोहोचवला, महाराष्ट्रातल्या चित्रपटगृह मालकांनी, मॅनेजर्सनी, तिकीट तसपणीकांनी आणि अगदी तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा हा चित्रपट लोकांना बघता यावा यासाठी दिवसरात्र काम केलंय. टीम मधल्या पहिल्या माणसापासून ते अगदी शेवटच्या माणसापर्यंत सर्वांनीच प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं हे फळ, आणि हे सगळं जुळून येणं दुर्लभ असत. जे 'दशावतार' ला साध्य झालयं. आमच्याच नाही तर प्रामाणिक पणे घडणाऱ्या प्रत्येक सिनेमाला असाच यश लाभो ही इच्छा !"

Comments
Add Comment

या सिनेमासाठी शाहिद कपूरने आकारलं बॉलीवूडच्या करिअर मधलं सर्वात जास्त मानधन.

मुंबई : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच शाहिद कपूर हा सध्या त्याच्या कॉकटेल २ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये असला

हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवाहन, जिंकलं चाहत्यांचं मन

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार काही ना काही कारणास्तव चर्चेत

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कॅनडा : प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या चार महिन्यांत

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

दिल्लीमध्ये खास भेट! नितीन गडकरींच्या हातून संकर्षणला खास पुस्तक भेट

दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता.

Vicky Kaushal : विकी कौशलचा मोठा खुलासा! म्हणाला...'वेळ जवळ आलीय', बाळाच्या आगमनाबाबत दिली मोठी हिंट

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक विकी कौशल (Vickey Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आईबाबा होणार